नोएडा सेक्टर-29 मधील एका घराला आग; वृद्ध दाम्पत्याला वाचवण्यात अग्निशमन दलाला यश; 18 डिसेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
टीम लेटेस्टली
|
Dec 18, 2020 11:56 PM IST
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मध्य प्रदेशातील शेतकर्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरसिंग द्वारा संवाद साधणार आहेत. दरम्यान सध्या देशात कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलनं तीव्र होत आहेत. शेतकरी हे कायदे रद्द करण्यासाठी 23 दिवस आंदोलनं करत आहेत. केंद्रीय नेत्यांसोबत शेतकरी नेते चर्चा करत आहेत मात्र अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आता मोदी या चर्चेमध्ये काय संबोधित करणार? याकडेच सार्यांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्रात आता कोरोना आटोक्यात येत असल्याचं चित्र आहे. मात्र अनेकांचं लक्ष आता लसीकरण मोहिमेकडे लागलं आहे. कोरोना वायरसच्या थैमानानंतर त्याचा खात्मा करण्यासाठी भारत लसीकरणासाठी सज्ज होत आहे. यामध्ये केंद्रीय पथकाकडून मंजुरी मिळाल्यानंतर तात्काळ राज्यात लसीकरण सुरू होऊ शकतं असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्ह्टलं आहे. तसेच काल त्यांनी कर्मचार्यांना दिलेल्या दिलासादायक बातमी दिली आहे. यामध्ये आता कोरोनाबाधित राज्य सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना वैद्यकीय खर्च परत दिला जाणार आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
महाराष्ट्रात जानेवारी 2021 पर्यंत लसीकरणाला सुरूवात होऊ शकते. त्यासाठी लसीकरणाकरिता प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. नाव नोंदणी सुरू आहे. कोविड योद्धे, आरोग्य कर्मचारी, को मॉर्बिडीटी असलेले रूग्ण यांचा पहिल्या टप्प्यांत समावेश आहे.