Live
US: जो बिडेन यांची राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याशी फोनवर चर्चा करत दिल्या शुभेच्छा ; 17 नोव्हेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Darshana Pawar
|
Nov 17, 2020 11:53 PM IST
आज हिंदुहृदयसम्राट आणि शिवसेना पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांची स्मृतीदिन आहे. या निमित्ताने मुंबईतील शिवाजी पार्क येथील स्मारकाचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच शिवसैनिक हजेरी लावत आहेत.
देशासह राज्यातील कोरोना व्हायरसचे संकट नियंत्रणात येत असल्याचे चिन्ह दिसू लागले आहे. तरी देखील संसर्ग वाढणार नाही यासाठी खबरदारी घेणे गरजेचे आहे. राज्यात अनलॉक 6 च्या माध्यमातून धार्मिक स्थळं, प्रार्थना स्थळं कालपासून सुरु करण्यात आली आहेत. मात्र त्यासाठी विशेष नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंत सर्व सुविधा सुरु करुन जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. दरम्यान, लसीच्या विकासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
मुंबईतील शालेय शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना मुंबई लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. तसंच इयत्ता 9 ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा देखील सुरु करण्यात येणार आहेत. दरम्यान, सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा कधी सुरु होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.