कोरोना व्हायरस संकटाचा सर्वाधिक फटका पर्यटन, ट्रॅव्हल, हॉस्पिटॅलिटी उद्योगांना बसला आहे. इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अकाउंटंट्स (आयएमए) च्या अहवालात पुढे आली माहिती.

उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील शेतात तीन मुली बेशुद्धावस्थेत सापडल्या. उपचारादरम्यान दोघींचा मृत्यू झाला आहे. या मुलींना विषबाधाही झालेली असू शकते, असे डॉक्टरांनी म्हटले आहे.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी महाविकासआघाडी सरकारला पत्र लिहीले आहे. या पत्रात विधानसभा अध्यक्ष कधी नेमणार आहात अशी विचारणा करण्यात आली आहे. या पत्रावरुन पुन्हा एकदा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. राज्यपाल आणि महाविकासआघाडी सरकार यांच्यातील संबंध गेल्या काही दिवसामध्ये फारच ताणलेले आहेत. त्यामुळे राजभवन आणि महाविकासआघाडी सरकार यांच्यात चांगलेच मानापमान नाट्य पाहायला मिळत आहे.

कॉंग्रेसचे माजी खासदार कॅप्टन सतीश शर्मा यांचे आज गोव्यात निधन झाले.

परराष्ट्र सचिव हर्ष श्रृंगला यांनी रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जे लवरोव यांची भेट घेतली. त्यांनी भारत आणि रशिया यांच्यातील विस्तृत राजनैतिक भागीदारी आणि त्यास आणखी बळकट करण्याच्या मार्गांवर चर्चा केली: रशियामधील भारतीय दूतावास

यूकेचे प्रिन्स फिलिप आजारी पडल्याने रुग्णालयात दाखल झाले आहेत.

यूकेचे प्रिन्स फिलिप आजारी पडल्याने रुग्णालयात दाखल झाले आहेत.

Actor Sandeep Nahar Suicide Case: अभिनेता संदीप नहार आत्महत्येप्रकरणी त्याच्या पत्नी आणि सासूविरूद्ध गोरेगाव पोलिसांनी कलम 306 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिवंगत अभिनेत्याच्या वडिलांनी तक्रार दिल्यानंतर प्रकरणाचा तपास केला जात आहे, असे पोलिसांचे सांगितले आहे. अभिनेता संदीप नाहर 15 फेब्रुवारी रोजी त्याच्या निवासस्थानी मृत अवस्थेत आढळला होता.

Coronavirus in Mumbai: आज मुंबईत 721 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 421 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

Jammu & Kashmir: श्रीनगरमधील सोनवार भागात दहशतवाद्यांच्या गोळीबारात तरुण गंभीर जखमी झाला असून उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Load More

राज्यात करोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याची वेळ येऊ नये, यासाठी गर्दी टाळणे, मास्कचा वापर करणे, समारंभ साधेपणाने साजरे करणे आदी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना केले आहे. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात सार्वजनिक ठिकाणी कोरोना नियमांचे कठोरपणे पालन होताना दिसत नाही. गर्दी टाळण्यासाठी आंदोलने, सभा, मिरवणुकांना परवानगी देऊ नये, अशा सूचनाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रशासकीस अधिकाऱ्यांना दिल्या.

दरम्यान, राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असेल, असं म्हटलं आहे. राजेश टोपे यांनी म्हटलं आहे की, प्रत्येक जिल्ह्यांमध्ये स्थानिक अधिकाऱ्यांना सुचना देण्यात आल्या आहेत. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांना पुर्ण आदेश दिले आहेत, लॉकडाउन हा अंत्यत शेवटचा पर्याय असेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

तर दुसरीकडे औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड शहरात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून 7 जण जखमी झाले आहेत. कन्नड शहरातील चौधरी पेट्रोल पंपाजवळ हा भीषण अपघात झाला.