Close
Advertisement
 
सोमवार, डिसेंबर 16, 2024
ताज्या बातम्या
33 minutes ago

बंगळुरुत क्यूबॉन परिसरात अज्ञात व्यक्तींनी बार मालकावर गोळीबार केल्याने जखमी ; 15 ऑक्टोबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

बातम्या अण्णासाहेब चवरे | Oct 15, 2020 11:48 PM IST
A+
A-
15 Oct, 23:47 (IST)

बंगळुरुत क्यूबॉन परिसरात अज्ञात व्यक्तींनी बार मालकावर गोळीबार केल्याने  जखमी  झाला आहे.

15 Oct, 23:43 (IST)

आसाम येथे कोरोनाचे आणखी 769 रुग्ण आढळल्याने आकडा 1,98,982 वर पोहचला आहे.

15 Oct, 23:33 (IST)

आसाम पोलिसांकडून उपनिरीक्षक भरती संदर्भातील पेपर लीक केल्याने दोन पोलिसांना अटक करण्यात आली आहे.

15 Oct, 23:10 (IST)

IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबने आजच्या आयपीएल सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 8 गडी राखून पराभव केला.

15 Oct, 22:48 (IST)

महाराष्ट्रात पुण्यात आज 1,197 नवीन कोरोना व्हायरस रुग्ण व 38 मृत्यूंची नोंद झाली आहे. अशाप्रकारे जीळ्यातीक एकूण संक्रमितांची संख्या 3,11,627 वर व मृत्यूंची संख्या 7,335 वर पोहोचली आहे.

15 Oct, 22:26 (IST)

तेलंगणा मधील हैदराबाद येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे विविध ठिकाणी वॉटरलॉगिंग झाले आहे.

15 Oct, 22:08 (IST)

कर्नाटक येथे 45 वर्षीय बार मालकावर दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार करण्यात आला आहे.

15 Oct, 21:46 (IST)

ऑस्कर विजेत्या कॉस्ट्युम डिझायनर भानु अथैया यांचे वयाच्या 91 वर्षी निधन झाले आहे.

15 Oct, 21:39 (IST)

विधानसभेच्या पोटनिवडणूकीसाठी गुजरात मधील  लिंबाडी मतदारसंघातून चेतन खचर यांच्या उमेदवारीला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मान्यता दिली आहे.

15 Oct, 21:22 (IST)

मुंबईत कोरोनाचे आणखी 2119 रुग्ण आढळल्याने आकडा 2,36,725 वर पोहचला आहे.

Load More

राज्य आणि केंद्र सरकार कोरोना व्हायरस संसर्ग टाळण्यासाठी सुरु करण्यात आलेला लॉकडाऊन अनलॉकचा उतारा देऊन हळूहळू शिथील करत संपवण्याच्या मार्गावर आहे. आतापर्यंत पाच वेळा अनलॉक करण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारने काल (14 ऑक्टोबर) राज्यात टाळेबंदी आणखी शिथिल केली. त्यानुसार राज्यात मेट्रो रेल्वे सेवा, ग्रंथालये सुरु करण्यास परवानगी दिली. त्यामुळे गेले सात महिने बंद असलेली मेट्रो सेवा पुन्हा एकदा प्रवाशांच्या सेवेत रुजू झाली. तसेच, येत्या रविवारपासून राज्यातील मोनोरेल्वेही सुरु करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. दरम्यान, राज्य सरकारने अनेक सेवा सुरु करण्यास परवानगी दिली असली तरी शाळा, महाविद्यालयं आणि प्रशिक्षण संस्थांवरील निर्बंध मात्र 31 ऑक्टोबरपर्यंत कायम राहणार आहेत.

दुसऱ्या बाजूला राज्यात आगोदरच चर्चेत असलेल्या आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या जलयुक्त शिवार योजनेची चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. जलयुक्त शिवार योजनेत गैरकारभार झाल्याचे ताशेरे 'कॅग'ने ओढल्यानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. आपली प्रतिमा स्वच्छ राखण्याचा प्रयत्न करत कारभार केलेल्या देवेंद्र फडणवी यांच्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने दिलेला हा मोठा धक्का मानले जात आहे.

राज्यात कोरोना, राजकारण, राज्यपाल मुख्यमंत्री संघर्ष असे सगळे सुरु असताना उरलीसुरली कसर मुसळधार पावसाने भरुन काढली आहे. राज्यातील विविध भागात मुसळार पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. काही ठिकाणी वीज कोसळून, तर काही ठिकाणी घरांच्या भींती, छत उडून अनुचीत घटना घडल्या आहेत.

दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील काही ठिकाणी पाऊस पुन्हा एकदा आठवडाभर सक्रीय राहण्याची शक्यता आहे. घाटमाथा आणि पुणे येथे काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकेल. यासोबतच राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, विदर्भ आदी ठिकाणीही हलका ते मध्यमस स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि गुजरातच्या काही भागांमधून मोसमी पाऊस परतत आहे. असे असले तरी महाराष्ट्रात मोसमी पाऊस परतण्यात आणखी काही काळ लागण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरस, जागतिक, स्थानिक राजकारण, शेती, विज्ञान, शिक्षण, आरोग्य, माहिती-तंत्रज्ञान, क्रीडा, संस्कृती, यांसह विविध क्षेत्रातील ठळक घडामोडींचा ताजा तपशील पाण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉगसोबत जोडलेले राहा.


Show Full Article Share Now