राज्यात महामारी रोग कायदा 1897 लागू.  COVID-19 विषाणू नियंत्रणात आणण्यासाठी संशयितांवर पाळत ठेवणे आणि प्रतिबंधात्मक उपाय योजण्याचे प्रशासनातील अधिकाऱ्यांना राज्य सरकारचे आदेश.

राज्यात महामारी रोग कायदा 1897 लागू.  COVID-19 विषाणू नियंत्रणात आणण्यासाठी संशयितांवर पाळत ठेवणे आणि प्रतिबंधात्मक उपाय योजण्याचे प्रशासनातील अधिकाऱ्यांना राज्य सरकारचे आदेश.

राज्यातील असलेल्या कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या शहरनिहाय पाहता ती, पुणे – 15, मुंबई – 5, ठाणे – 1, कल्याण – 1, नवी मुंबई – 2, अहमदनगर – 1, नागपूर – 4, यवतमाळ – 2 अशी आहे.

कोरोना व्हायरस बाधित असल्याचा संशय असलेले 3 रुग्ण रुग्णालयातून पळाल्याची घटना घडली आहे. या प्रकाराबाबत तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या 26 वरुन थेट 31 वर पोहोचला आहे. आज आणखी नव्या 5 रुग्णांची चाचणी पॉझिटीव्ह आली आहे.

विदेशातून मायदेशी परतलेल्या एका व्यक्तीचे बुलडाण्यातील जिल्हा रुग्णालयात आज निधन झाले. त्याचा मृत्यू कोरोनाव्हायरसमुळे झाला किंवा नाही याची पुष्टी झालेली नाही. त्याचा नमुना चाचणीसाठी पाठविला आहे. अहवालाची प्रतीक्षा आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
एएनआय ट्विट

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्व मॉल बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कोरोना व्हायरस विरोधात करण्यात येणाऱ्या उपाययोजनेचा भाग म्हणून राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

जयपूर येथे स्पेन येथून परतलेल्या 24 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे.

कोरोना व्हायरसमुळे नागपूर येथील रुग्णालयातून पळालेले रुग्ण निगेटीव्ह असल्याची माहिती समोर येत आहे.

तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून कळवा फाटक स्थानकात रेल्वे थांबली आहे.

Load More

जगभरात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना व्हायरसने देशासह महाराष्ट्रातही दहशत वाढवायला सुरुवात केली आहे. कोरोना व्हायरसचा वाढता फैलाव लक्षात घेता सरकारकडून अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, पिंपरी-चिंचवड येथील सर्व जिम आणि स्विमिंग पूल्स 30 मार्च पर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत. तर काही खाजगी शाळांनी कालपासूनच उन्हाळी सुट्ट्या सुरु करत 1-8 वीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. पुणे, पिंपरी चिंचवड येथील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र 10-12 वी च्या परीक्षा वेळापत्रकानुसार सुरु राहणार आहेत.

तसंच राज्यातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करावी, अशी याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. कंपन्यांनीही कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची मुभा द्यावी, अशी मागणीही या याचिकेत करण्यात आली आहे. गुढीपाडव्या निमित्त ठाणे, डोबिंवली येथे आयोजित करण्यात येणाऱ्या शोभायात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. तसंच IPL 2020 सामने 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहेत. पंजाब, तामिळनाडू येथील शाळांना 31 मार्चपर्यंत सुट्टी देण्यात आली आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

पुण्यात 10, नागपुरात 3, मुंबईत 4, ठाण्यात 1 तर नगरमध्ये 1 कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 19 वर पोहचला आहे. देशात कोरोनाचे एकूण 81 रुग्ण आढळून आले आहेत. तर या व्हायरसने दोघांचा बळी घेतला आहे. तरीही घाबरुन न जाता काळजी घेण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे.

अमेरिकेत आतापर्यंत 1100 हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली असून त्यात 40 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाची दहशत पाहता अमेरिकेतही राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आली आहे.

तर समाजकार्याला झोकून देण्यासाठी बिल गेट्स यांनी मायक्रोसॉफ्टच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर येत आहे.