Close
Advertisement
 
शुक्रवार, नोव्हेंबर 15, 2024
ताज्या बातम्या
5 minutes ago

उत्तर प्रदेशात 6 नव्या रुग्णांसह कोरोना बाधितांची एकूण संख्या 25,430 वर ; 13 फेब्रुवारीच्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

बातम्या अण्णासाहेब चवरे | Feb 13, 2021 11:14 PM IST
A+
A-
13 Feb, 23:13 (IST)

उत्तर प्रदेशात 6 नव्या रुग्णांसह कोरोना बाधितांची एकूण संख्या 25,430 वर पोहोचली आहे.

13 Feb, 22:19 (IST)

झारखंडमध्ये आज दिवसभरात 41 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून 29 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

13 Feb, 21:49 (IST)

दिल्लीत मागील 24 तासांत 138 कोरोना रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण 6,24,866 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

13 Feb, 21:23 (IST)

मणिपूर मध्ये 17 नव्या रुग्णांसह कोरोना बाधितांची एकूण संख्या 29,183 वर पोहोचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 373 वर पोहोचली आहे.

13 Feb, 20:53 (IST)

उत्तराखंड मधील तपोवन परिस्थितीचा आपत्ती निवारण दलाच्या पथकाकडून आढावा  घेण्यात आला आहे.

13 Feb, 20:29 (IST)

जपान मधील Namie च्या ईस्ट नॉर्थईस्ट मध्ये  भुंकपाचे धक्के  जाणवले आहेत.

13 Feb, 20:15 (IST)

राहुल गांधी यांनी जयपूर मधील ट्रॅक्टर रॅलीला दर्शवला पाठिंबा, पहा फोटो

13 Feb, 19:44 (IST)

मालेगाव मधील दाभाडी येथील शेतकऱ्याने शेतात पिकवले रंगीत फ्लॉवर्स, पहा फोटो

13 Feb, 19:10 (IST)

देशात आतापर्यंत 80,52,454 जणांचे लसीकरण झाल्याची आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे. 

13 Feb, 18:33 (IST)

दिल्ली पोलिसांकडून नागरिकांना बनावट पासपोर्ट आणि व्हिजा देणाऱ्या 59 एजेंट्सना अटक  करण्यात आली आहे.

Load More

लॉकडाऊन काळात नियमीत असलेला विजपूरवठा वपरून आणि वीजबिल भरण्यास पुरेसा अवधी दिला असतानाही काही ग्राहकांनी विजबील भरले नाही, अशा ग्राहकांवर महावितरण कडक कारवाईचे धोरण अवलंबवत आहे. राज्यातील वीज देयक थकबाकी मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. आर्थिक गर्तेत सापडलेल्या वीज महामंडळाने या गर्तेतून बाहेर पडण्यासाठी ग्राहकांकडून वीजबिल वसुरी करण्याची मोहीम हती घेतली आहे. त्यामुळे गेली 10 महिने एकदाही विजबील न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपूरवठा खंडीत करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे.

भारत चीन सीमावाद प्रश्नी होत असलेल्या टीकेला केंद्र सरकारने प्रत्युत्तर दिले आहे. पूरव लद्दाख आणि पॅंगॉंग सरोवर भागात दोन्ही देशांचे सौन्य मागे जात आहे. सैन्य माघारीची चर्चा उभय देशांमध्ये सुरु असताना भारताने चीनला कोणत्याही प्रकारचे अश्वासन दिले नाही, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. भारताने आपल्या हद्दीतील काही भूभाग चीनला दिल्याचा दावा विरोधी पक्षाने केला होता. त्यानंतर केंद्र सरकारने हे स्पष्टीकरण दिले आहे.

पूजा चव्हाण नामक एका तरुणीने केलेल्या कथीत आत्महत्या प्रकरणात महाविकासआघाडी सरकारमधील एका मंत्र्याचे नाव पुढे येत आहे. भाजप प्रदेश उपाध्यक्षा यांनी शिवसेना मंत्री संजय राठोड यांच्यवर थेट निशाणा साधत या प्रकरणात राठोड यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. या मागणीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर पुन्हा एकदा राजकीय संकट उभे राहिले आहे.

दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलनाचे नेते राकेश टिकैत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपली भूमिका पुन्हा स्पष्ट केली आहे. शेतकरी आंदोलन हे सत्ताबदल करण्यासाठी नव्हे तर शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आहे. त्यामुळे केंद्र सरकारने वेळीच विचार करावा. केंद्र सरकारने जर शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या तर आंदोलन थांबविण्यात येईल असेही राकेश टिकैत यांनी म्हटले आहे.

शेतकरी आंदोलन, राजकारण, समाज, संस्कृती, क्रीडा, विज्ञाण, कोरोना व्हायरस, कोरोना लस यांसर स्थानिक, प्रादेशीक आणि राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घटना, घडामोडींचा ताजा तपशील जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी सोबत जोडलेले राहा.


Show Full Article Share Now