कर्नाटकचे सीएम बीएस येडियुरप्पा यांचे KSRTC कर्मचार्यांना त्यांचा संप थांबवण्याचे आवाहन; 13 डिसेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
टीम लेटेस्टली
|
Dec 13, 2020 11:32 PM IST
13 डिसेंबर 2001 साली संसदेवर झालेल्या हल्ल्याची आज वर्षपूर्ती आहे. या निमित्ताने ज्यांनी या हल्ल्यांच्या वेळेस आपल्या प्राणांची आहुती देत वीरता दाखवली त्यांना स्मरण करण्यासाठी आजचा दिवस आहे. या निमित्ताने भारताचे पंत्प्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अन्य राजकीय मंडळींनी आपली श्रद्धांजली अर्पण केली आहे.
देशभरात कृषी कायद्याविरोधात शेतकर्यांचं आंदोलन तीव्र होत असताना अमेरिकेत वॉशिंगटन डीसी मध्ये त्याचे पडसाद पहायला मिळाले. मात्र अमेरिकेत देशविरोधी संघटना एकत्र येत आंदोलन करताना दिसत आहेत. खलिस्तानी झेंडे दिसले.तसेच एम्बेसी जवळ असलेल्या महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची देखील अवमानना केली असल्याची माहिती दिली आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
भारतामध्येही आज शेतकरी आंदोलनाचा 18 वा दिवस आहे. शाहजहांपूरकडे शेतकरी येण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान आज दिल्लीजयपूर हायवे जाम करण्यास सुरूवात झाली आहे. तर चिल्ला सीमेवरील शेतकर्यांनी आंदोलन मागे घेऊन तेथील मार्ग मोकळा आहे. दिल्ली-नोएडा मार्ग आता खुला करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात आज-उद्या वीजांच्या कडकडाटासह पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात सर्वदूर पुढील 2 दिवस पावसाचे असणार आहेत.