ताजिकिस्तान मध्येही रात्री 10.31 च्या सुमारास जाणवले भूकंपाचे धक्के ; 12 फेब्रुवारीच्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Bhakti Aghav
|
Feb 12, 2021 10:58 PM IST
महाराष्ट्रात काही जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील निवासी वसतिगृहात 75 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय नागपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात 500 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे नागपूरमध्ये 4 दिवसांत 1 हजार 398 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 1 लाख 37 हजार 498 इतकी झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्याने नागरिकांच्या खिशाला कात्री लागली आहे. आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. मुंबईमध्ये आज पेट्रोलचा दर 94.36 रुपये प्रतिलिटर असा आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
दरम्यान, उत्तराखंडच्या चमोली येथे आपत्तीनंतर बचावकार्य सुरू आहे. आयटीबीपीबरोबरचं सैन्य दल, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि स्थानिक पोलिस मदतकार्यात सहभागी आहेत. आतापर्यंत 33 हून अधिक लोकांचे मृतदेह सापडले आहेत. याशिवाय बेपत्ता झालेल्या 170 लोकांचा शोध सुरू आहे.