Close
Advertisement
 
सोमवार, डिसेंबर 16, 2024
ताज्या बातम्या
23 minutes ago

झारखंड येथे आज 189 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; 12 डिसेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

बातम्या Darshana Pawar | Dec 12, 2020 11:45 PM IST
A+
A-
12 Dec, 23:44 (IST)

झारखंड येथे आज 189 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 11 हजार 366 वर गेली आहे. ट्विट-

 

12 Dec, 22:51 (IST)

आसाम: गुवाहाटीच्या 'नागरीक समाज'ने आज नागरिकत्व सुधार कायद्याच्या (CAA) विरोधात आंदोलन केले.

12 Dec, 22:20 (IST)

राजस्थानच्या चित्तोडगडमध्ये दोन वाहने एकमेकांना धडकल्याने 10 ठार. जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. यासंदर्भात एएनआय वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे. ट्विट-

 

12 Dec, 22:02 (IST)

मल्याळम लेखक युए खादर यांचे वयाच्या 85 व्या वर्षी कोझिकोड येथे निधन झाले. ट्वीट-

 

12 Dec, 21:47 (IST)

पॅरिस हवामान बदल कराराच्या उद्दिष्टपूर्तीत भारताची आघाडी, नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात भरीव कामगिरी, जागतिक हवामान बदल शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन. ट्वीट-

 

12 Dec, 21:13 (IST)

कृषी विधेयक सुधारणेमुळे ग्रामीण भागातील तरुण शेतकऱ्यांना व्यापार करण्याची आणि पुरवठा साखळी चालविण्याची संधी मिळणार आहे, अशी माहिती भाजपने आपल्या ट्विटर हॅंडलवर दिली आहे. ट्विट-

 

12 Dec, 20:45 (IST)

केरळ राज्यात कोविड लस विनामूल्य दिली जाणार आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनाराय विजयन यांनी याबाबत माहिती दिली.

12 Dec, 20:20 (IST)

गुजरातमध्ये आज कोरोना विषाणूच्या 1,203 रुग्णांची व 12 मृत्यूंची नोंद झाली आहे. आज राज्यात 1338 रुग्णांना सोडण्यात आले आहे. राज्यातील एकूण संक्रमितांची संख्या 2,26,508 वर पोहोचली असून, 2,08,867 रुग्ण बरे झाले आहेत व 4,160 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

12 Dec, 19:18 (IST)

राज्य आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात आज कोरोना विषाणूच्या 4,259 रुग्णांची व 80 मृत्यूंची नोंद झाली आहे. आज 3,949 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील एकूण संक्रमितांची संख्या 18,76,699 झाली असून, बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या 17,53,922 व मृत्यूची संख्या 48,139 झाली आहे.

12 Dec, 18:43 (IST)

Tamil Nadu: 8 वर्षांपूर्वी जप्त आणि सीलबंद केलेले 43 कोटी रुपये किंमतीचे 103 किलो सोने बेपत्ता झाल्यानंतर, सीबीआयने 'अंतर्गत चौकशी' सुरू केली आहे. अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली.

Load More

ऐन हिवाळ्यात काल मुंबईत पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. त्यामुळे मुंबईकरांनी वेगळ्या वातावरणाचा अनुभव घेतला. आता मुंबईनंतर दिल्लीच्या काही भागांमध्ये आज हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. दरम्यान, आज राजधानीमध्ये तुरळक पाऊस, ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. तर किमान तापमान 11 डिग्री सेल्सियस तर कमाल तापमान 26 डिग्री सेल्सियस राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एफआयसीसीआयच्या 93 व्या वार्षिक सभेत संबोधित करणार असून ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कार्यक्रमाला उपस्थित राहतील. दरम्यान, देशात लवकरच कोविड-19 वरील लस उपलब्ध होईल, असा विश्वास मोदींनी देशवासियांना दिला आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

अमेरिकेच्या FDA कडून Pfizer Inc च्या कोवि़ड-19 लसीला आपात्कालीन वापरासाठी परवानगी मिळाली आहे, अशी माहिती रॉयटर्सने दिली आहे. दरम्यान, भारतातही फायझरने आत्पातकालीन वापरासाठी अर्ज दाखल केला आहे. त्याचबरोबर भारत बायोटेक ची Covaxin देखील या शर्यतीत उतरली आहे. दरम्यान, लसीकरणासाठी योजना महाराष्ट्रात ठरवण्यात आली आहे. आता केवळ लसीला मान्यता मिळण्याची प्रतिक्षा आहे.


Show Full Article Share Now