झारखंड येथे आज 2 हजार 64 कोरोनाबाधित आढळले; 5 जणांचा मृत्यू; 1 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Siddhi Shinde
|
Sep 01, 2020 11:41 PM IST
आज पासुन देशभरात जेईई परिक्षेला सुरुवात होत आहे. सर्व परिक्षा केंद्रावर सुरक्षेचे सर्व नियम पाळून या विद्यार्थ्यांना परिक्षा देता येणार आहे. दरम्यान महाराष्ट्रात JEE आणि NEET परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लोकलमध्ये प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे, परीक्षेचं अॅडमिट कार्ड पाहून स्टेशनमध्ये प्रवेश मिळणार, अशी माहिती मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून परिपत्रक जारी करुन देण्यात आली आहे.
दुसरीकडे देशाचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी (Pranab Mukherjee Death) यांंच्या निधनानंंतर आज राष्ट्रपती भवन व संंसदेवरील तिरंंगा अर्ध्यावर आणण्यात आला आहे. देशभरात सात दिवसांचा दुखवटा पाळण्यात येणार असल्याची सुद्धा माहिती समजत आहे यानुसार देशातील शासकीय इमारतींंवरील झेंंडा अर्ध्यावरच आणला जाईल तसेच सात दिवस मनोरंंजनाचा कोणताही शासकीय कार्यक्रम होणार नाही असे सांंगण्यात आले आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
दरम्यान, आज अनंंत चतुर्दशी (Anant Chaturdashi) च्या मुहुर्तावर देशभरात बाप्पा आपल्या भाविकांंचा निरोप घेणार आहेत. कोरोनाचे संंकट पाहता मोठमोठ्या गणेश मंंडळानी सुद्धा मंडपातच कृत्रिम तलाव/हौद तयार करुन विसर्जन करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यातील पाच मानाच्या गणपतींंचे व मुंंबईतील गणेशगल्ली, चिंंचपोकळीचा चिंंतामणी येथील गणेश मुर्तींंचे विसर्जन सुद्धा अशाच पद्धतीने पार पडेल.