1 एप्रिलला तुम्ही Fool's होणार नाही तर खरचं 'या' गोष्टी महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

1 एप्रिल पासून आर्थिक वर्ष सुरु होणार आहे. तसेच आर्थिक वर्षात काही गोष्टी महागणार आहेत तर काही गोष्टी स्वस्त होणार आहेत. त्यामुळे एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला तुम्ही फूल बनणार नसून खरच या गोष्टी महाग होणार असून सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे.

तर पाहूयात कोणत्या गोष्टींवरील किंमतीत दर वाढ होणार आहे. तसेच सर्वसामान्यांना याचा आर्थिक वर्षात फटका बसणार आहे.

कारच्या किंमती वाढणार

येत्या 1 एप्रिल पासून कार खरेदी करण्याचा विचार करत असल्यास त्याच्या किंमतीत वाढ होणार आहे. टाटा मोटर्स, जॅग्युआर, टोयोटा किर्लोस्कर मोटर्स या कार उत्पादन कंपन्यांनी त्यांच्या कारच्या किंमतीत वाढ करणार आहेत. टाटा मोटर्सच्या किंमती 25 हजार रुपयापर्यंत वाढणार आहे. त्याचसोबत जॅग्युआर आणि जेएलआर या महागड्या आणि आलिशान कारच्या किंमतीत 4 टक्क्यांनी वाढ होणार आहे.

CNG आणि PNG च्या किंमती वाढणार

सर्वसामान्यांच्या खिशाला 1 एप्रिल पासून कात्री बसणार असून सीएनजी आणि पीएनजी इंधनाच्या किंमतीत वाढ होणार आहे. नैसर्गिक गॅसचे दर 18 टक्क्यांनी वाढणार असून पीएनजी आणि सीएनजीची किंमत सुद्धा महागणार आहे. या सर्वांचा परिणाम उत्पादक, एनर्जी सेक्टर आणि प्रवास कंपन्यांना याचा फटका बसणार आहे.

(हेही वाचा-1 एप्रिल पासून घरगुती गॅसच्या किंमती वाढण्याची शक्यता, आजच बुक करा)

कोरोनरी स्टेंट या शस्त्रक्रियेच्या किंमतीत वाढ

हृदयाशी निगडित असणाऱ्या कोरोनरी स्टेंट या शस्रक्रियेच्या किंमतीत 1 एप्रिल पासून वाढ होणार आहे. गेल्या वर्षी लागू करण्यात आलेल्या या क्रियेसाठीची किंमत फक्त मार्च अखेर पर्यंत आहे.

विमान प्रवास महागणार

बँकांच्या मदतीने जरी जेट एअरवेजचे आर्थिक संकट काही दिवसात दूर होणार आहे. मात्र विमान प्रवासाची तिकिटे महागणार आहेत. त्यामुळे एका सरकारी समितीने प्रवाशांना पीएसफ घेण्यास सांगितले आहे.

(हेही वाचा-एप्रिल महिन्यात बदलणार 'या' गोष्टी,कोणत्या आहे ते जाणून घ्या)

पेट्रोल डिझेलच्या किंमती भडकणार

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बद्दल बोलायचे झाले तर काही दिवसांपासून त्याचे दर स्थिर आहेत. मात्र एप्रिल पासून याच्या किंमती वाढणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा खिशाला कात्री बसणार आहे.

त्यामुळे 1 एप्रिलला तुम्ही फूल होणार नसून खरच या सर्व गोष्टी महागणार असल्याचे ग्राहकांनी लक्षात ठेवावे.