एप्रिल महिन्यात बदलणार 'या' गोष्टी,कोणत्या आहे ते जाणून घ्या
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

येत्या 1 एप्रिल पासून काही गोष्टी बदलण्याची शक्यता आहे. तसेच आर्थिक वर्ष सुरु होत असल्याकारणाने पॅनकार्ड,रियल इस्टेट, जीएसटी, बँक, म्युचुअल फंड, ईपीएफ यांसारख्या अन्य गोष्टींबद्दलच्या नियमात बदल होणार आहे.

तसेच जर तुम्ही आधार कार्ड पॅन कार्डसह लिंक केले नसल्यास ते 1 एप्रिलपूर्वी लिंक करा. नाहीतर तुमचे पॅन कार्ड रद्द होण्याची शक्यता आहे. तसेच तुम्ही बुकिंग केलेल्या ट्रेनच्या वेळेत पोहचू शकला नाहीत आणि ट्रेन निघुन गेल्यास अशा स्थितीत तुम्हाला तिकिटाचे रिफंड पुन्हा मिळू शकणार आहे. हा नियम सर्व रेल्वेच्या क्लाससाठी लागू होणार आहे. तर जाणून घ्या अन्य कोणत्या गोष्टींबद्दलच्या नियमात बदल करण्यात येणार आहेत.

- 1 एप्रिल 2019 पासून प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेता येणार नाही. या योजनेसाठी शेवटची तारीख 31 मार्च 2019 ठेवण्यात आली आहे. जर तुम्हाला घर खरेदी करायचे असल्यास या योजनेचा उपयोग करुन 2.6 लाख रुपयांची मदत मिळू शकते.

- म्युचुअल फंड संबंधित नियम नवीन नियम लागू होणार आहेत. या नियमाअंतर्गच संपूर्ण खर्चाचा रेश्यो 2.25 असणार आहे. तर क्लोज एंडेड सिस्टिमसाठी 1.25 टक्के शुल्क भरावा लागणार आहे.

-पुढील महिन्याचा 1 तारखेपासून 125 सीसी पेक्षा अधिक लॉक ब्रेंकिग सिस्टिम बाईकमध्ये असणे जरुरीचे आहे. त्याचसोबत 125 सीसी पर्यंतच्या बाईकमध्ये कॉम्बी ब्रेक सिस्टिम असणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे बाईकवरुन प्रवास करणे सुरक्षित होईल.

-वीज बिलाचे मीटर प्रीपेड (Prepaid) होणार आहे. त्यामुळे तुम्ही जेवढ्या वीजेचा उपयोग करणार त्याच्याच रिचार्ज करावा लागणार आहे. अशा पद्धतीचे मीटर एप्रिल महिन्यापासून लोकांच्या घरात लावण्यास सुरुवात करणार आहे.

-बँक ऑफ बडोदा आयसीआयसीआय बँकेला पाठी सोडणार आहे. तर 1 एप्रिल रोजी विजया बँक, देना बँक आणि बँक ऑफ बडोदा यांचे विलिकरण होण्यासाठी मान्यता मिळणार आहे.

-मारुती सुजुकी त्यांची दुसऱ्या जनरेशनची कार अर्टिगा एलजीआयचे उत्पादन 1 एप्रिलपासून बंद करणार आहे. त्यामुळे कार विक्रेत्यांना या कारची बुकिंग करणे थांबवण्यास सांगितले आहे.

-एअर इंडिया 1 एप्रिले रोजी दिल्ली आणि चंदीगढ प्रवासासाठी विमानाची सोय करणार आहे. एअरबस 320 नियो एअरक्राफ्टच्या माध्यमातून एअर इंडिया ही विमानसेवा सुरु करणार आहे. तर सोमवार ते शनिवार या दिवसात ही विमानसेवा सुरु ठेवण्यात येणार आहे.

त्यामुळे नागरिकांनी आताच या गोष्टींबाबत जागृक राहावे. तसेच 1 एप्रिल पासून बदलणाऱ्या नियमांबाबत योग्य ती माहिती घेऊनच पुढील कामे करावी असे सांगण्यात आले आहे.