SCO Summit 2020: शांघाय सहकार संघटनेच्या बैठकीत पाकिस्तानने दाखवला चुकीचा नकाशा; या कृत्यामुळे अजित डोभाल यांनी अर्धवट सोडली बैठक
National Security Advisor Ajit Doval | File Image | (Photo Credits: PTI)

SCO Summit 2020: पाकिस्तान कोठेही असला तरी आपल्या वाईट गोष्टी सोडत नाही. शांतता आणि संवाद समजत नसल्याचं आज पुन्हा एकदा पाकिस्तानने दाखवून दिलं आहे. पाकिस्तानने शांघाय सहकार संघटनेच्या बैठकीत (SCO Summit) चुकीचा नकाशा दाखवला आहे. पाकिस्तानच्या या कृत्यामुळे भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली असून भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल (Ajit Doval) यांनी बैठक अर्धवट सोडली.

शांघाय सहकार संघटनेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीत पाकिस्तानने मुद्दाम हा वादग्रस्त नकाशा मांडला. पाकिस्तानने बैठकीच्या नियमांचे उल्लंघन केले. ज्यानंतर यजमान रशियाचा विरोध झाल्यानंतर भारताने निषेध केला आणि या बैठकीतून माघार घेतली, असे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं आहे. (हेही वाचा - Navneet Rana On MPLADS Funds: आमचे वेतन घ्या परंतु, खासदार निधी कापू नका; नवनीत राणा यांची लोकसभेत मागणी)

दरम्यान, पाकिस्तानने 4 ऑगस्ट रोजी एक नवीन नकाशा जाहीर केला होता. ज्यात पाकिस्तानने संपूर्ण जम्मू-काश्मीर, लडाख आणि गुजरातचा काही भाग व्यापलेला दाखवला आहे. आपला हेतू काय आहे, हे पाकिस्तानने पुन्हा एकदा बैठकीत स्पष्ट केलं आहे, असंही परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.