Navneet Rana On MPLADS Funds: आमचे वेतन घ्या परंतु, खासदार निधी कापू नका; नवनीत राणा यांची लोकसभेत मागणी
Navneet Kaur Rana (Photo Credit: Twitter)

Navneet Rana On MPLADS Funds: अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा (MP Navneet Ravi Rana) यांनी आज लोकसभेत 'खासदारांचे वेतन घ्या, पण खासदार निधी कापू नका, अशी विनंती केली आहे. दरम्यान, आज लोकसभेमध्ये संसदेच्या सदस्यांचे वेतन, भत्ते आणि निवृत्तीवेतन (दुरुस्ती) विधेयक 2020 मंजूर केले.

या विधेयकावरील चर्चेनंतर नवनीत राणा यांनी कृपया आमचे पगार घ्या, पण कृपा करुन मतदारसंघाच्या विकासासाठी दिला जाणाऱ्या निधीत कपात करु नका, अशी विनंती केली. या दुरुस्ती विधेयकानुसार, सर्व खासदारांचे पुढील वर्षभरासाठी 30 टक्के वेतन कापण्यात येणार आहे. (हेही वाचा -National Unemployment Day: पंतप्रधान मोदी यांचा बर्थडे ‘राष्ट्रीय बेरोजगार दिन’ म्हणून साजरा करा, विरोधी पक्षांचे अवाहन)

दरम्यान, नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्यावर झालेल्या हल्ल्यावरून टीका केली होती. उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात एकही शब्द न बोलणं म्हणजे त्या हल्ल्याचं समर्थन आहे. संवेदनाहीन मुख्यमंत्री याबाबत दिलगिरी सुद्धा व्यक्त करत नाहीत. हा संपूर्ण देशातील माजी सैनिकांचा अपमान आहे. या प्रकरणी लोकसभेत आवाज उचलणार असल्याचंही नवनीत राणा यांनी म्हटलं होतं.