Photo Credit- X

Manipur Violence: मणिपूरमधील हिंसाचाराचे (Violence) चक्र थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. शुक्रवारी संध्याकाळी कांगपोकपी जिल्ह्यातील पोलिस अधीक्षक (एसपी) कार्यालयावर जमावाने हल्ला केला. सायबोल गावातून केंद्रीय सुरक्षा दलांना न हटवण्यात आल्यामुळे हा हल्ला (Stone-Pelting) करण्यात आला. या घटनेत अनेक जण जखमी झाले असून पोलीस कार्यालयात उभ्या असलेल्या वाहनांचे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सायबोल गावातून कथितपणे केंद्रीय दले न हटवल्याबद्दल शुक्रवारी संध्याकाळी कांगपोकपी जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक कार्यालयावर जमावाने हल्ला केला.

सायबोल हे गाव इम्फाळ पूर्व जिल्ह्याच्या सीमेवर आहे. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. 31 डिसेंबर रोजी सायबोल गावात सुरक्षा दलांनी महिलांवर केलेल्या कथित लाठीचार्जच्या विरोधात कुकी संघटना आंदोलन करत आहेत. एका अधिकाऱ्याने सांगितले की, गावात केंद्रीय दल, विशेषत: सीमा सुरक्षा दल (BSF) आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) यांच्या सतत तैनातीबद्दल संताप व्यक्त करण्यासाठी हल्लेखोरांनी कार्यालयावर दगडफेक केली. पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात ठेवलेल्या जिल्हा पोलिसांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली.

मणिपूरमध्ये हिंसाचार

हल्ल्याचे कारण

31 डिसेंबर रोजी सायबोल गावात महिलांवर केंद्रीय सुरक्षा दलांनी (बीएसएफ आणि सीआरपीएफ) बळाचा वापर केल्याच्या निषेधार्थ हिंसाचार सुरू झाला. या कारवाईविरोधात कुकी समाजाच्या लोकांनी निदर्शने केली. आंदोलकांनी एसपी कार्यालयावर दगडफेक केली आणि तोडफोड केली. कार्यालयाच्या आवारात उभ्या असलेल्या अनेक पोलिसांच्या वाहनांचे नुकसान केले. इम्फाळ पूर्व जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सायबोल गावातून केंद्रीय सैन्य हटवण्यात यावे, अशी त्यांची मागणी होती.