Blast At Steel Plant In Tirupati District (फोटो सौजन्य - PTI)

Blast At Steel Plant In Tirupati District: आंध्र प्रदेशातील तिरुपती जिल्ह्यातील (Tirupati District) स्टील प्लांटमध्ये (Steel Plant) झालेल्या भीषण स्फोटानंतर (Blast) संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पेनेपल्ली येथील अग्रवाल स्टील प्लांटमध्ये बुधवारी रात्री मोठा स्फोट झाला. या घटनेत 6 जण जखमी झाले आहेत. या स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की, आजूबाजूच्या गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, प्लांटमधून मोठा स्फोट झाला आणि त्यानंतर छोट्या स्फोटांची मालिका सुरू झाली. ही घटना बुधवारी रात्री 10.15 च्या सुमारास घडली, जेव्हा प्लांटचा बॉयलर कथितरित्या खराब झाला, ज्यामुळे मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, त्यामुळे दूरवर असलेल्या घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आणि परिसरातील इमारतींचे नुकसान झाले.

तिरुपती स्टील प्लांटमध्ये अपघात -

या अपघातात एकूण 6 जण जखमी झाले आहेत. जखमी कामगारांना नेल्लोर आणि नायडूपेटा येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. प्लांट तात्पुरता बंद करण्यात आला असून या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की त्यामुळे जवळपासच्या घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. (हेही वाचा -Blast IOCL Refinery In Gujarat's Vadodara: गुजरातमधील वडोदरा येथील आयओसीएल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, पहा व्हिडिओ)

तिरुपती जिल्ह्यातील स्टील प्लांटमध्ये स्फोट, पहा व्हिडिओ- 

सुरतमधील स्टील प्लांटमध्ये आग -

गुजरातमधील सुरतमध्ये नुकतीच एक मोठी दुर्घटना घडली. वास्तविक, हजिरा औद्योगिक क्षेत्रातील स्टील प्लांटला लागलेल्या आगीत 4 मजुरांचा मृत्यू झाला होता.

याप्रकरणी सुरतचे पोलीस आयुक्त अनुपम सिंह गेहलोत यांनी सांगितले की, प्लँटच्या एका भागात जळणारा कोळसा अचानक सांडल्याने आग पसरली. परिणामी आगीमुळे प्लांटच्या लिफ्टमध्ये असलेल्या चार कामगारांचा मृत्यू झाला.