Blast IOCL Refinery In Gujarat's Vadodara: गुजरातमधील (Gujarat) वडोदरा जिल्ह्यातील (Vadodara District) कोयाली भागात सोमवारी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Oil Corporation Limited) च्या रिफायनरीमध्ये मोठा स्फोट झाला. हा स्फोट (Blast) आयओसीएल रिफायनरी (IOCL Refinery) च्या स्टोरेज टँकमध्ये झाला. स्फोटानंतर रिफायनरीमध्ये भीषण आग लागली. यानंतर काही किलोमीटर अंतरावर धुराचे लोट दिसत होते.
आग लागल्यानंतर आजूबाजूच्या कंपन्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. आग विझवण्यासाठी सुमारे 10 फायर इंजिनांचा वापर करण्यात येत आहे. (हेही वाचा - Hyderabad Fire: हैदराबादमध्ये आरामघर क्रॉसरोडजवळील स्क्रॅप यार्डमध्ये भीषण आग, पहा व्हिडिओ)
गुजरातमधील IOCL रिफायनरीमध्ये स्फोट, पहा व्हिडिओ -
#WATCH | Vadodara, Gujarat: Workers evacuate amid rising smoke after a blast occurred at IOCL refinery in Koyali. More details awaited. pic.twitter.com/O1aNAoz5u4
— ANI (@ANI) November 11, 2024
वडोदराचे जिल्हाधिकारी बिजल शाह यांनी सांगितले की, दुपारी 3.50 च्या सुमारास हा स्फोट झाला. वडोदरा येथील कोयली भागात स्थित IOCL रिफायनरी ही भारतीय तेल महामंडळाचा भारत सरकारचा उपक्रम आहे. आगीच्या घटनेची माहिती मिळताच स्थानिक अधिकारी घटनास्थळी हजर झाले आहेत. तत्पूर्वी, सुमारे 20 वर्षांपूर्वी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या गुजरात रिफायनरीत मोठा स्फोट झाला होता. 2005 च्या घटनेत 13 जण जखमी झाले होते.