उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) शामलीतील (Shamli) कैराना (Kairana) येथील एका फटाकाच्या कारखान्यात (Cracker Factory) मोठा स्फोट झाला आहे. या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. इतर अनेक लोक जखमी आहेत. जखमींपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. तर, काही जण घराच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलीस आणि स्थानिक लोक त्यांना बाहेर काढण्यात व्यस्त आहेत. कैराना शहरात असलेल्या लोणच्या बनवण्याच्या कारखान्यात हा स्फोट झाला, जिथे बेकायदेशीरपणे फटाके बनवले जात होते, असे पोलिसांनी सांगितले आहे.
कैराना शहरातील राजवाहेच्या काठावर असलेल्या फटाका कारखान्यात संध्याकाळी पाचच्या सुमारास भीषण स्फोट झाला. वरिष्ठ पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. आतापर्यंत घटनास्थळावरून चार मृतदेह बाहेर काढण्यात आले असून बचावकार्य सुरू आहे. हे देखील वाचा-Mumbai Hit And Run Case: फ्लायओव्हर वर कारने अचानक घेतलेल्या यू टर्न ने दोन बाईकस्वारांचा घेतला जीव
या स्फोटात जवळपास 12 जण जखमी झाले आहेत, त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, स्फोट इतका जबरदस्त होता की तेथे उपस्थित असलेले लोक मोठ्या संख्येने त्यात अडकले. अपघात होताच पोलीस-प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.