Mumbai Hit And Run Case: फ्लायओव्हर वर कारने अचानक घेतलेल्या यू टर्न ने दोन बाईकस्वारांचा घेतला जीव
Mumbai Hit and Run Case| PC: Twitter/mid_day (Screengrab From Video)

मुंबई (Mumbai) मध्ये दोन तरूणांनी त्यांची बाईक कार वर आदळल्याने जीव गमावल्याची घटना समोर आली आहे. या अपघातामध्ये लोअर परेल (Lower Parel) मध्ये फिनिक्स मॉल समोरील सेनापती बापट पूलावर ( Senapati Bapat Marg) एका कारने अचानक यु टर्न (U-Turn)  घेतल्याने समोरून भरधाव वेगाने येणारी बाईक आपटली आणि त्यावरील दोघा बाईकस्वारांचा जीव गेला. दरम्यान ही घटना बुधवार (27 सप्टेंबर) रात्रीची असून सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये कैद झाली.

बुधावारी 10 वाजून 50 मिनिटांनी एका कारने अचानक फ्लायओव्हर वरच यू टर्न घेतला. यामध्ये समोरून बाईक वरून येणारा भावेश अरूण संघवी आणि कृष्ण कुराडकर या दोघांना जबर धक्का बसला. उपचारासाठी त्यांना नायर रूग्णालयात नेण्यात आले पण एकाचा हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वीच तर दुसर्‍याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातामध्ये कार चालक कोणतीही मदत न करता दादरच्या दिशेने पळून गेल्याचं सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये पहायला मिळालं आहे. मीडीया रिपोर्ट्समध्ये कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याच्यावर हीट अ‍ॅन्ड रन सह संबंधित आरोप लावण्यात आले आहेत. नक्की वाचा: गुजरात मध्ये रस्त्यावरुन जाणाऱ्या बाइकची खड्ड्यांमुळे ट्रॅकटरसोबत टक्कर, व्यक्तीच्या अंगावरुन गाडी लोटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस (Video).

सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला अपघात

दोन मृत बाईकस्वारांसोबतच विरूद्ध दिशेने येणारा अजून एक बाईकस्वार जखमी झाला आहे. मात्र त्याची प्रकृती स्थिर आहे. दोन्ही मृत बाईकस्वार हे अवघ्या पंचवीशीमधील होते. नायर हॉस्पिटल मध्ये त्यांची ऑटोप्सी करून नंतर अंत्यविधींसाठी त्यांचा मृतदेह नातेवाईकांकडे देण्यात आला.