Uttar Pradesh Shocker: मोठ्या भावाच्या पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला, उपचारापूर्वीच महिलेचा मृत्यू; आरोपीला अटक
Image used for represenational purpose (File Photo)

Man Stabs Elder Brother's Wife To Death: उत्तर प्रेदशच्या (Uttar Pradesh) मुरादाबाद (Moradabad) जिल्ह्यात एका व्यक्तीने आपल्या मोठ्या भावाच्या पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला केला आहे. या हल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला आहे. ही घटना काटघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मकबारा परिसरात शनिवारी रात्री घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे.

तराना प्रवीण असे मृत महिलेचे नाव आहे. तर, इम्रान असे आरोपीचे नाव आहे. परंतु, घटनेच्या वेळी महिला घराच्या पहिल्या मजल्यावर एकटीच होती आणि कुटुंबातील सदस्य तळमजल्यावरील खोलीत होते. त्याचवेळी इम्रानने तिच्यावर चाकूने हल्ला केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तराना यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. तसेच या हल्लानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, परिसरातील रहिवाशांनी त्याला पकडले आणि पोलिसांच्या हवाली केले. हे देखील वाचा- Delhi Shocker: नीट बसायला सांगताच विद्यार्थ्याचा राग अनावर; लोखंडी रॉडने शिक्षकावर हल्ला

आरोपी इम्रानला अटक करण्यात आली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत, असे कटघर पोलीस ठाण्याचे एसएचओ गजेंद्र सिंह यांनी सांगितले आहे. महत्वाचे म्हणजे, मृत महिलेला 3 मुलगी आणि एक मुलगा असे एकूण चार मुले आहेत. तर, आरोपी इम्रान मनोरुग्ण असल्याचे मृताच्या पतीचे म्हणणे आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.