Delhi Shocker: नीट बसायला सांगताच विद्यार्थ्याचा राग अनावर; लोखंडी रॉडने शिक्षकावर हल्ला
Murder (Photo Credits: Pixabay)

वर्गात शिक्षकाने नीट बसायला सांगितल्याने राग अनावर झालेल्या 11 वी च्या विद्यार्थ्याने शिक्षकांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना दिल्ली (Delhi) येथून समोर येत आहे. लेक्चर (Lecture) सुरु असताना शिक्षकांनी नीट बसण्याची सूचना केल्यावर विद्यार्थ्याला राग आला आणि रागाच्या भरात त्याने लोखंडी रॉड (Iron Rod) उचलून शिक्षकांवर हल्ला केला. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, ही घटना दिल्लीच्या रणहोला (Ranhola) येथे शनिवारी घडली.

ही घटना उघडकीस येताच पोलिस यंत्रणा कामाला लागली असून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे. Government Boys Senior Secondary School मधील ही घटना असून संबंधित विद्यार्थी हा 21 वर्षांचा आहे. तो दोनदा नापास झाल्याने पुन्हा 11 वीत बसला होता. लेक्चर सुरु असताना त्या विद्यार्थ्याने शिक्षकावर हल्ला केला.

ललित (21) असे या आरोपी विद्यार्थ्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्यावर आयपीसी कलम 308 अतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली आहे. (यवतमाळ मध्ये शिक्षक-विद्यार्थ्याच्या नात्याला काळिमा फसणारी घटना; जिल्हा परिषद शिक्षक विद्यार्थीनीवर बलात्काराच्या आरोपाखाली अटकेत)

दरम्यान, आपल्या संस्कृतीत शिक्षकांना गुरु मानले जाते. त्यांच्याप्रती आदरभाव ठेवण्याची शिकवण दिली जाते. शिक्षक दिन, गुरुपौर्णिमा या दिवशी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. मात्र हा वर्ग सुरु असताना शिक्षकांवर हल्ला करण्याचा हा प्रकार नक्कीच धक्कादायक आहे. या घटनेनंतर शिक्षकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. याउलट अनेकदा शिक्षक विद्यार्थ्यांवर अत्याचार करत असल्याच्या अनेक घटना यापूर्वी समोर आल्या आहेत. त्यामुळे प्रत्येकाने सद्सदविवेक बुद्धी जागृत ठेवून आपले कर्तव्य बजावणे अत्यंत महत्त्वाचे आहे.