यवतमाळ मध्ये शिक्षक-विद्यार्थ्याच्या नात्याला काळिमा फसणारी घटना; जिल्हा परिषद शिक्षक विद्यार्थीनीवर बलात्काराच्या आरोपाखाली अटकेत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिक्षकाकडून मागील 2 महिन्यांपासून बलात्कार होत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
शिक्षक विद्यार्थ्याच्या नात्याला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना महाराष्ट्रातील यवतमाळ मध्ये समोर आली आहे. काल (7 ऑगस्ट) दिवशी यवतमाळ मध्ये एका जिल्हा परिषद शिक्षकाला विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिक्षकाकडून मागील 2 महिन्यांपासून बलात्कार होत असल्याची माहिती देण्यात आली आहे. नक्की वाचा: Mumbai Shocker: रिक्षा चालकाकडून भीक मागणार्या मुलीला अन्नाचं आमिष दाखवून पार्क केलेल्या स्कूल बस मध्ये बलात्कार; जुहूतील घटना.
PTI च्या वृत्तानुसार, आरोपी जिल्हा परिषद शिक्षकाचं नाव अरूण राठोड आहे. अरूण राठोड हा 51 वर्षीय आहे. यवतमाळ मध्ये बेलोरा जिल्हा परिषद शाळेमध्ये अरूणला काही गावातील मंडळींनी आक्षेपार्ह स्थितीमध्ये पाहिले. त्यानंतर त्यांनी त्याला फरफटत पोलिसांच्या स्वाधीन केले. नक्की वाचा: Nagpur Rape Case: नागपूर मध्ये अल्पवयीन तरूणीवर 2 वेळेस सामुहिक बलात्कार; 3 जण अटकेत.
दरम्यान अरूण राठोड शाळा झाल्यानंतर विद्यार्थिनीला ट्युशनच्या नावाखाली थांबवून घेत होता. त्यानंतर संधीचा फायदा बलात्कार करत होता. हे मागील दोन महिन्यांपासून सुरू होते. पोलिसांनी आता अरूणला अटक केल्यानंतर आयपीसी आणि Protection of Children from Sexual Offences (POCSO) Act अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
(The above story first appeared on LatestLY on Aug 08, 2021 11:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

