मुंबई (Mumbai) मध्ये एका भीक मागून आपला उदरनिर्वाह करणार्या मुलीवर बलात्कार झाल्याची किळसवाणी घटना समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार 31 वर्षीय रिक्षावाल्याने या मुलीला अन्न देण्याच्या बहाण्याने जवळ केले. एका रिकाम्या बस मध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार मुंबई मध्ये जुहू (Juhu) परिसरात घडला असून यामध्ये आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, यामध्ये पोलिसांनी 24 तासांत आरोपीला अटक केली असून त्याच्या रिक्षावरील स्किटर वरून त्याला शोधण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. Beed Suicide: छेडछाडीला कंटाळून 14 वर्षीय मुलीची आत्महत्या, उच्चशिक्षित अभियंत्याविरोधात गुन्हा दाखल.
आरोपीचं नाव आरीफ सरवर आहे. त्याने मागील आठवड्यात बलात्कार पीडितेला बुधावारी रिकाम्या स्कूल बसमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. मुलीचं वय 21 वर्ष असून ती जुहू मध्ये फूटपाथ वर राहत होती. मुलीने तक्रारीमध्ये दिलेल्या माहितीत अन्न देण्याच्या बहाण्याने तिला तो घेऊन गेल्याचं म्हटलं आहे. मुलगी सुदैवाने पोलिस स्टेशन मध्ये पोहचली त्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. नक्की वाचा: Nagpur Rape Case: नागपूर मध्ये अल्पवयीन तरूणीवर 2 वेळेस सामुहिक बलात्कार; 3 जण अटकेत.
मीडीया रिपोर्ट मध्ये इन्सपेक्टर शशिकांत माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅमेरा ग्रॅब्स मधून ऑटोच्या काही क्लिपिंग्स पाहून रिक्षाचा शोध लावण्यात आला. रिक्षावर एक निळ्या रंगाचं स्टिकर होते ते पाहून शोध घेणं सोपं झाले होते. टेक्निकल एक्सपर्ट्सची मदत घेऊन पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.