माकडांवर गुन्हा दाखल करा, मृत वृद्धाच्या घरातल्यांची मागणी
फोटो सौजन्य - Unsplash

उत्तर प्रदेशातील टिकरी या गावात माकडांनी केलेल्या हल्ल्यामुळे एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची विचित्र घटना घडली आहे. या प्रकरणाची त्यांच्या घरातील मंडळींनी पोलिसांत माकडांविरुद्ध तक्रार करण्यास गेले होते. मात्र हा एक अपघात असल्याचे पोलिसांनी कारण सांगत या घटनेकडे कानाडोळा केला आहे.

धर्मपाल सिंह असं या वृद्धाचे नाव आहे. ते बुधावरी हवन करण्यासाठी लाकडे लागणार होती म्हणून जवळच्या जंगलात गेले होते. त्याचवेळी लाकडे तोडत असताना तेथील माकडांच्या टोळीने धर्मपाल यांच्यावर हल्ला केला. या माकडांच्या हल्ल्यापासून बचावण्यासाठी धर्मपाल यांनी विटा व दगड फेकून मारण्यास सुरुवात केली. मात्र 50-60 जण असलेल्या टोळीने धर्मपाल यांच्यावर उलट जोरदार हल्ला केला. या घटनेत ते गंभीर जखमी झाले. तसेच उपचारादरम्यान धर्मपाल यांचा मृत्यू झाला.

यामुळे धर्मपाल यांच्या घरातील मंडळींनी संताप व्यक्त करत चक्क माकडांवर गुन्हा दाखल करावा असे पोलिसांना सांगितले.