Students Suspended For Reels Video: रुग्णालयाच्या आवारात रिल्स बनवणं पडलं महागात, ३८ विद्यार्थ्यांना निलंबित
Students Suspended For Reels Video: PC Twitter

Students Suspended For Reels Video: कर्नाटकातील गदग येथील गदग इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेन च्या 38 वैद्यकिय विद्यार्थ्यांना निलंबित केले आहे. रुग्णालायच्या आवारात रील्स बनवून सोशल मीडियावर अपलोड केल्यावरून विद्यार्थ्यांना निलंबित केले आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने यावर दखल घेतली आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी एका डॉक्टरने ऑपरेशन थिएटरमध्ये बनावट ऑपरेशन करत असतानाचा प्री वेडिंग शुट केला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कर्नाटकच्या प्रशासनाने त्वरित यावर कारवाई केली आणि डॉक्टरला बडतर्फ केले.

 मिळालेल्या माहितीनुसार, वैद्यकिय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रुग्णालयाच्या कॉरिडॉरमध्ये रिल्स बनवले.  व्हिडिओमध्ये विद्यार्थी हिंदी आणि कन्नड गाण्यांवर डान्स करताना दिसत आहेत. हे रिल्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे यावर अनेक युजर्सनी कंमेट करून टीका केले आणि संताप व्यक्त केला. यानंतर जीआयएमएसचे संचालक डॉ. बसवराज बोमनहल्ली यांनी ३८ विद्यार्थ्यांना पुढील १० दिवसांसाठी निलंबित केले. हेही वाचा- चक्क ऑपरेशन थीएटरमध्ये प्री- वेडींग शुट, व्हिडिओ व्हायरल होताच डॉक्टराला प्रशासनाकडून नोटीस

मीडीया  रिपोर्टनुसार,वैद्यकिय महाविद्यालयाचे संचालक डॉ. बसवराज बोम्मनहल्ली यांनी विद्यार्थ्यांना निलंबित केले आणि भविष्यात अशा घटना घडल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला होता. एक रिल्समध्ये 3 विद्यार्थी नाचताना दिसत आहे आणि दुसऱ्या रिल्समध्ये 10 हून अधिक विद्यार्थी रिल्स बनवताना दिसत आहे.