Pre Weddng Shoot PC Twitetr

Viral Video: प्री वेडिंग करणं हा लग्ना आधीचा एक विधीच झाला आहे. आज प्रत्येक आपआपल्या परीने प्री वेडिंग करत आहे. दरम्यान एका डॉक्टराला प्री वेडींग करणं महागात पडल आहेत. डॉक्टरांने लग्नाच्या आधीचे फोटोशुट चित्रदुर्ग जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयातील ऑपरेशन थिएटरमध्ये केल आहे.या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहेत. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने यात दखल दिली आहे. या पराक्रम पाहून कर्नाटकचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी शुक्रवारी प्री वेडिंग करणाऱ्या डॉक्टराला बडतर्फ केले आहे.( हेही वाचा- शार्दुल ठाकूरच्या लग्नाआधीच्या समारंभात गायले रोमँटिक बॉलिवूड गाणे)

मिळालेल्या माहितीनुसार,डॉक्टर अभिषेक असं शुट करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.  कर्नाटकटे आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी डॉक्टरावर संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, सरकारी रुग्णालये ही जनतेच्या सेवेसाठी असतात, वैयक्तिक कामांसाठी नव्हे. मी अशी प्रकारची अनुशासनात्मकता खपवून घेणार नाही. "सर्व डॉक्टर, कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक तत्त्वांनुसार त्यांची कर्तव्ये पार पाडावी लागतील. मी आधीच संबंधित डॉक्टर आणि अधिकाऱ्यांना सरकारी रुग्णालयांच्या जागेचा गैरवापर करू नये, असे निर्देश दिले आहेत.

या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे.  व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक युजर्सनी जोरदार टीका केली आहे. भरमसागर सरकारी रुग्णालयात डॉक्टर अभिषेक एक महिन्यापूर्वींच आरोग्य अधिकारी म्हणून पदभार साभांळला. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, अभिषेत एक बनावट ऑपरेशन करत होता. त्याच्या सोबत त्याची होणारी पत्नी देखील होती.