Goods Trains Derail In UP (फोटो सौजन्य - PTI)

Goods Trains Derail In UP: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) फतेहपूर जिल्ह्यातील खागा परिसरातील पंभीपूरजवळ मंगळवारी सकाळी दोन मालगाड्यांची टक्कर झाली. या अपघातात मालगाडीचा डबा आणि इंजिन रुळावरून घसरले. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. मिळालेल्या माहितीनुसार, DFCCIL ट्रॅकवर सिग्नल नसल्याने पहिली मालगाडी उभी होती. यावेळी दुसऱ्या मालगाडीने मागून धडक दिली. या घटनेनंतर अप लाईन विस्कळीत झाली असून रेल्वे अधिकारी या प्रकरणाची चौकशी करत आहेत. ही घटना रेल्वेच्या व्यावसायिक कॉरिडॉरवर खागा कोतवाली परिसरात घडली.

दोन्ही गाड्यांचे मोटरमन जखमी - 

अद्याप, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. अपघातामुळे अनेक गाड्या थांबविण्यात आल्या. दोन्ही गाड्यांचे मोटरमन जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. रेल्वे प्रशासन शक्य तितक्या लवकर ट्रॅक मोकळा करण्याचा आणि सामान्य वाहतूक पूर्ववत करण्याचा प्रयत्न करत आहे. (हेही वाचा -Goods Train Derailed in West Bengal: पश्चिम बंगालमध्ये मालगाडीचे 5 डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतूक विस्कळीत (Watch Video))

प्रदेशात मालगाड्या रुळावरून घसरल्या, पहा व्हिडिओ - 

रेल्वे प्रशासनाने या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशीनंतरच अपघाताचे खरे कारण समोर येईल. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.