MahaShivratri 2021: महाशिवरात्री च्या दिवशी आज मुंबईतील बाबुलनाथ, नाशिकचं त्र्यंबकेश्वर मंदिर बंद; उज्जैनच्या महाकाल तर काशी विश्वेश्वर मध्ये भाविकांची गर्दी
Trimbakeshwar Temple in Nashik | Photo Credits: Twitter/ANI

शिव शंकराच्या भक्तांसाठी आजचा दिवस खास आहे. माघ कृष्ण चतुर्दशी दिवशी महाशिवरात्र (MahaShivratri) साजरी केली जाते. यंदा भारतामध्ये अद्यापही कोरोना वायरसचं संकट घोंघावत असल्याने शिवभक्तांच्या उत्साहावर कोविड 19 चं सावट आहे. महाराष्ट्रात वाढती रूग्णसंख्या पाहता महत्त्वाची मंदिरं बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे. तर उज्जैनच्या महाकाली मंदिरामध्ये, काशी विश्वेशवरच्या मंदिरामध्ये हरिद्वारमध्ये हर की पुरी घाटावर भाविकांची गर्दी पहायला मिळाली आहे. अनेकांनी हर ही पुरी घाटावर देखील पाण्यात डुबकी मारण्यासाठी गर्दी केल्याचं पहायला मिळालं आहे.

महाराष्ट्रात 'देऊळ बंद'

महाराष्ट्रात नाशिक मधील त्र्यंबकेश्वर मंदिर बंद आहे. तर मुंबईतही प्रसिद्ध देवस्थान बाबुलनाथ मंदिर ठेवण्यात आले आहे.

उज्जैनच्या महाकाली मंदिरात

उज्जैनच्या महाकाली मंदिरामध्ये शिवपिंडावर अभिषेक करण्यात आला.

हरिद्वार

ची हर की पुरी घाट

हरिद्वारमध्ये हर की पुरी घाट वर भाविकांनी पवित्र पाण्यामध्ये डुबकी मारली होती.

वाराणसी मध्ये काशी विश्वेश्वर मंदिर

वाराणसीच्या काशी विश्वेश्वर मंदिरामध्ये भाविकांनी पहाटेपासूनच लांबच लांब लावलेली पहायला मिळाली आहे. (नक्की वाचा: Mahashivratri 2021 Live Darshan & Aarti: महाशिवरात्री निमित्त काशी विश्वेश्वर ते सोमनाथ मंदिरामधील भगवान शंकराचं दर्शन, आरती इथे पहा लाईव्ह!)

झारखंडी महादेव मंदिर

गोरखपूरच्या झारखंडी महादेव मंदिरामध्येही भाविकांनी लांबच लांब रांग लावलेली पहायला मिळाली आहे.

महाशिवरात्र दिवशी शंकराचे भक्त देवाला प्रसन्न करण्यासाठी उपवास करतात. भगवान शंकर हा देवांचा देव असून तो सृष्टीचा संरक्षकर्ता आहे. त्यामुळे त्याची कृपादृष्टी कायम रहावी याकरिता महाशिवरात्रीच्या सकाळपासूनच भोलेनाथाच्या मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते. भाविक शंकराच्या आवडीच्या गोष्टी त्याला अर्पण करून आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करतात.