Bus Falls Into Gorge On Nashik-Gujarat Highway (फोटो सौजन्य - PTI)

Bus Falls Into Gorge On Nashik-Gujarat Highway: नाशिक-गुजरात महामार्गावर (Nashik-Gujarat Highway) लक्झरी बस दरीत कोसळून (Bus Falls Into Gorge) किमान सात जणांचा मृत्यू झाला. तसेच 15 जण जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातच्या डांग जिल्ह्यात (Dang District) रविवारी पहाटे यात्रेकरूंना घेऊन जाणारी एक खाजगी बस खोल दरीत कोसळली.

प्राप्त माहितीनुसार, पहाटे 4.15 वाजता सापुतारा हिल स्टेशनजवळ बसच्या चालकाचे चाकांवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. पोलीस अधीक्षक एस.जी. पाटील यांनी सांगितले की, या लक्झरी बसमध्ये एकूण 48 यात्रेकरू होते. बस क्रॅश बॅरियर तोडून सुमारे 35 फूट खोल दरीत कोसळली. (हेही वाचा -ST Bus Accident CCTV Footage: धावत्या MSRTC एसटी बसचे चाक निखळले, 30 प्रवाशी थोडक्यात बचावले; वज्रेश्वरी-वसई मार्गावरील घटना)

या अपघातात दोन महिला आणि तीन पुरुषांचा जागीच मृत्यू झाला. तसेच 17 जण गंभीर जखमी झाले. जखमींना अहवा येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील काहींना किरकोळ दुखापत झाली आहे. अपघातग्रस्त बसमधील यात्रेकरू मध्य प्रदेशातील गुणा, शिवपुरी आणि अशोक नगर जिल्ह्यातील असल्याचं सांगण्यात येत आहे. (हेही वाचा - Maharashtra Road Accidents: महाराष्ट्रात 2024 मध्ये रस्ते अपघातात वाढ; मृत्यूच्या प्रमाणात किंचित घट, पहा आकडेवारी)

नाशिक-गुजरात महामार्गावर बस दरीत कोसळली, पहा व्हिडिओ - 

महाकुंभमेळ्यावरून परतणाऱ्या वाहनाला ट्रकने धडक, 6 भाविकांचा मृत्यू -

शुक्रवारी संध्याकाळी प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यावरून परतणाऱ्या वाहनाला ट्रकने धडक दिल्याने 6 भाविकांचा मृत्यू झाला. गाजीपूरमधील नंदगंज पोलिस ठाण्याजवळील कुस्मी कलाजवळ ही घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक लोक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.