कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकजण कमी पगारात आपले घर चालवत आहेत. तर, काहीजणांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहेत. दरम्यान, सर्वसामान्यांचे बजेट पुन्हा कोलमडणारी बातमी समोर आली आहे. एलपीजी गॅसच्या (Gas Cylinder Prices) किमतीत मोठी वाढ झाल्याचे समजत आहे. घरगुती गॅसच्या 14.2 किलो वजनाच्या टाकीच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ झाली आहे. तर, 5 किलोची छोटी टाकी 18 रुपयांनी महागली आहे. याशिवाय, 19 किलोच्या मोठ्या टाकीच्या किमतीत 36.50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. गॅस सिलिंडरसाठी दिल्लीत 644 रुपये, कोलकात्यात 670.50 रुपये, मुंबईत 644 रुपये आणि चेन्नईमध्ये 660 रुपये मोजावे लागणार आहेत.
सरकारकडून प्रत्येक कुटुंबाला वर्षाकाठी 12 सिलिंडवर अनुदान दिले जाते. मात्र त्यानंतर प्रत्येक सिलिंडर बाजार भावाप्रमाणे खरेदी करावा लागतो. स्वच्छ इंधन वापराला प्रोत्साहन देणाऱ्या केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडर गरिबांना मोठ्या संख्येने वितरित केले आहेत. देशात गेल्या आठ दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. मंगळवारपासून पेट्रोल आणि डीझेलच्या दरात कुठलीही वाढ झालेली नाही. हे देखील वाचा- RRB NTPC 2020 Exam Date,Admit Card: आरआर बी एनटीपीसी 'या' दिवशी मिळणार एडमिट कार्ड , परीक्षेच्या किती वेळ आधी पोहचाल सेंटर ला
घरगुती गॅस सिलिंडरचे ताजे दर पाहण्यासाठी सरकारी तेल कंपनीच्या संकेतस्थळावर भेट द्यावी लागणार आहे. तेल कंपन्या दर महिन्याला नवीन रेट जारी करतात. https://iocl.com/TotalProductList.aspx या लिंकवर जाऊन तुम्ही आपल्या शहरातील गॅस सिलिंडरचे किंमत पाहता येणार आहे.