PM Modi On YouTuber Ranveer Allahbadi: 'लोग कहेंगे तुम बीजेपी वाले हो गए हो'; पंतप्रधान मोदींनी  National Creators Award 2024 दरम्यान रणवीर अल्लाहबादियावर दिली मजेशीर प्रतिक्रिया
PM Modi, YouTuber Ranveer Allahbadi (PC - X/ANI)

PM Modi On YouTuber Ranveer Allahbadi: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शुक्रवारी राष्ट्रीय राजधानीतील भारत मंडपम येथे पहिल्या राष्ट्रीय निर्माते पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. समारंभादरम्यान, त्यांनी रणवीर अल्लाबदिया (Ranveer Allahbadi) यांना वर्षातील सर्वोत्कृष्ट 'डिसरप्टर ऑफ द इयर' पुरस्कार प्रदान केला. पंतप्रधान मोदींनी रणवीरचे अभिनंदन केले आणि काही फिटनेस मंत्र शेअर करण्यास सांगितले. रणवीरने पीएम मोदींच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, लोकांनी निरोगी राहण्यासाठी योगा, ध्यान इत्यादी करावे. दरम्यान, पीएम मोदींनी रणवीरला त्वरीत उत्तर देताना म्हटलं की, 'लोक आता म्हणतील की मोदीजी जे बोलतात तेच हे बोलत आहेत. लोक म्हणतील आता हे भाजपवाले झाले.' या संवादामुळे संपूर्ण कार्यक्रमादरम्यान एकच हशा पसरला. तथीप, यानंतर रणवीर म्हणाला की, 'पीएम मोदी स्वतः तरुणांची भाषा बोलत आहेत, त्यामुळे लोकांना असे वाटू शकते.'

पीएम मोदींनी रणवीरचे त्याच्या कामाबद्दल कौतुक केले आणि त्याला त्याच्या शोमध्ये झोपेच्या महत्त्वाबद्दल बोलण्यास सुचवले. आपल्या व्यस्त वेळापत्रकाबद्दल बोलताना, पीएम मोदींनी खुलासा केला की, गेल्या अनेक वर्षांपासून ते दररोज खूप कमी झोपतात. त्यामुळे लोकांमध्ये झोपेचे चक्र पूर्ण करण्याबाबत जागरुकता निर्माण झाली पाहिजे. (हेही वाचा -LPG Cylinder Prices: एलपीजी सिलींडर दरात 100 रुपयांची कपात, जागतिक महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा)

पहा व्हिडिओ - 

नॅशनल क्रिएटर्स अवॉर्ड हा कथाकथन, सामाजिक बदल, पर्यावरणीय स्थिरता, शिक्षण आणि गेमिंग यासह सर्व क्षेत्रांतील उत्कृष्टता आणि प्रभाव ओळखण्याचा प्रयत्न आहे. सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सर्जनशीलतेचा वापर करण्यासाठी एक लॉन्चपॅड म्हणून या पुरस्काराची कल्पना करण्यात आली आहे.

नॅशनल क्रिएटर अवॉर्डच्या पहिल्या फेरीत, 20 विविध श्रेणींमध्ये 1.5 लाखांहून अधिक नामांकने प्राप्त झाली. त्यानंतर, मतदान फेरीत, विविध पुरस्कार श्रेणींमध्ये डिजिटल निर्मात्यांसाठी सुमारे 10 लाख मते पडली. यानंतर, तीन आंतरराष्ट्रीय निर्मात्यांसह 23 विजेते निश्चित करण्यात आले.