LPG Cylinder Prices: एलपीजी सिलींडर दरात 100 रुपयांची कपात, जागतिक महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत केंद्र सरकराने एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 'X' खात्यावरुन केलेल्या घोषणेनुसार एलपीजी दरात 100 रुपयांची कपात करण्यात आली आहे.

LPG Cylinder Prices: एलपीजी सिलींडर दरात 100 रुपयांची कपात, जागतिक महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा
LPG Cylinder | (File Image)

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत केंद्र सरकराने एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 'X' खात्यावरुन केलेल्या घोषणेनुसार एलपीजी दरात 100 रुपयांची कपात करण्यात आली आहे. पंतपप्रधानांनी आपल्या एक्स हँडलवर म्हटले आहे की, एलपीजी दरात कपात करण्याच्या निर्णयामुळे देशभरातील लाखो कुटुंबांवरील आर्थिक भार लक्षणीयरीत्या कमी होईल. विशेषत: आपल्या नारी शक्तीचा फायदा होईल. स्वयंपाकाचा गॅस अधिक किफायतशीर बनवून, आम्ही कुटुंबांच्या कल्याणासाठी आणि आरोग्यदायी वातावरण सुनिश्चित करण्याचे देखील ध्येय ठेवतो. हे महिलांचे सक्षमीकरण आणि त्यांच्यासाठी ‘Ease of Living’ सुनिश्चित करण्याच्या आमच्या वचनबद्धतेशी सुसंगत आहे.

एक्स पोस्ट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 08, 2024 09:31 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).