Landlord rejects tenant for low marks in 12th (PC - Twitter)

Bengaluru: मेट्रो शहरांमध्ये मागणी जास्त असल्याने भाड्याने घर मिळणे कठीण आहे. बेंगळुरू (Bengaluru) आयटी हब (IT Hub) आणि स्टार्टअप्ससाठी ओळखले जाणारे शहर, उच्च भाडे किमती आणि घरमालकांच्या अवास्तव मागण्यांसाठी कुप्रसिद्ध आहे. काही लोक म्हणतात की बंगलोरमध्ये भाड्याने घर शोधण्यापेक्षा आयआयटीमध्ये प्रवेश करणे सोपे आहे. एका व्यक्तीने ट्विटरवर याबाबत त्याचा अनुभव शेअर केला आहे. 12वीत कमी गुण मिळाल्याने त्याच्या चुलत भावाला भावी घरमालकाने कसं नाकारलं हे त्याने आपल्या ट्विटद्वारे सांगितलं आहे.

कदाचित यावर तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. कारण, या व्यक्तीने त्याच्या चुलत भावाने ब्रोकरसोबत केलेल्या WhatsApp संभाषणाचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. ट्विटर वापरकर्ता शुभ (@kadaipaneeeer) याने शेअर केले की, एका ब्रोकरने त्याचा चुलत भाऊ योगेशला त्याचे LinkedIn, Twitter प्रोफाइल, तो ज्या कंपनीत नोकरीला होता त्याचे जॉइनिंग लेटर आणि त्याची इयत्ता 10वी आणि 12वीची मार्कशीट, आधार आणि पॅन कार्ड शेअर करण्यास सांगितले. तसेच त्याला स्वत:बद्दल 200 शब्दांचा लेख लिहायलाही सांगितले. (हेही वाचा - Uttar Pradesh Shocker: रंग लावण्याच्या बहाण्याने शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग; झाली अटक, गुहा दाखल (Disturbing Video))

त्यानंतर ब्रोकरने त्याला कळवले की, घरमालकाने त्याच्या बारावीच्या गुणांच्या विचित्र कारणामुळे त्याला नाकारले. ब्रोकरने सांगितले की, घरमालकाला 12वी मध्ये 90 टक्के अपेक्षित होते. मात्र या भाडेकरूला बारावीत 75 टक्के गुण मिळाले होते. 'गुण तुमचे भविष्य ठरवत नाहीत, परंतु तुम्हाला बंगलोरमध्ये फ्लॅट मिळेल की, नाही हे निश्चितपणे ठरवते,' अस कॅप्शने शुभने या पोस्टला दिलं आहे.

शुभने कमेंटमध्ये शेअर केलं आहे की, हा घरमालक आयआयएममधून निवृत्त प्राध्यापक आहे. शुभच्या या पोस्टवर नेटीझन्सनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. यातील अनेकांनी स्व:ताचे अनुभव सांगितले आहेत. यातील एका युजर्सने म्हटलं आहे की, 'हाहा, हे एक दुःखद वास्तव आहे आणि जेव्हा माझ्या मालकाला माझ्या कामाबद्दल माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी मला कॉफीसाठी आमंत्रित केले.' दुसऱ्या एका वापरकर्त्याने प्रतिक्रिया दिली आहे की, भाऊ खरं आहे. तसेच, जर तुम्ही तुमच्या मोलकरणीला सांगितले की तुम्ही काही IT कंपनीत काम करता, तर ती तुमच्याकडे घरकामासाठी 30 हजार रुपयांची मागणी करेल. जर तुम्ही तिला IT मध्ये काम करत नाही असं पटवून देऊ शकलात तर तेच शुल्क 9 हजारांपर्यंत कमी होईल. दुसऱ्या एका यूजर्सने म्हटलं आहे, 'लवकरच आमची बंगळुरू फ्लॅट्ससाठी प्रवेश परीक्षा होणार आहे!!!'