Lalu Prasad Yadav Health Update: बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हृदयविकाराच्या तक्रारीनंतर लालूंना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हृदयरोगतज्ज्ञांनी लालू प्रसाद यांना अँजिओप्लास्टी (Angioplasty) करण्याचा सल्ला दिला होता. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर गुरुवारी त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. लालू प्रसाद यांना आरोग्याशी संबंधित अनेक गंभीर आव्हानांचा सामना करावा लागत आहे. लालू प्रसाद यादव यांची प्रकृती चिंताजनक असल्याने न्यायालयाने त्यांना उपचार घेण्याची परवानगी दिली असून त्या आधारे त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.
प्राप्त माहितीनुसार, राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आली. 10 सप्टेंबर रोजी त्यांना मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये दाखल करण्यात आले. बुधवारी त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. लालूंना एक-दोन दिवसांत रुग्णालयातून डिस्चार्ज मिळू शकतो. (हेही वाचा - इंडिया आघाडीच्या बैठकी पूर्वी RJD chief Lalu Prasad Yadav यांनी लेक, Bihar Deputy CM Tejashwi Yadav यांच्यासोबत घेतलं मुंबईत श्रीसिद्धिविनायकाचं दर्शन (Watch Video))
यापूर्वी 2014 मध्येही लालूप्रसाद यांच्यावर मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये उपचार करण्यात आले होते. त्यावेळी सहा तासांची शस्त्रक्रिया होऊन त्याच्या हृदयाचा झडप (ऑर्टिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट) बदलण्यात आला. यानंतर 2018 आणि 2023 मध्येही ते उपचारासाठी एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये गेले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा त्यांना अँजिओप्लास्टीसाठी दाखल करण्यात आले. अँजिओप्लास्टी ही एक अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे हृदयाच्या नसांमधील अडथळा दूर केला जातो. (हेही वाचा -Lalu Prasad Yadav Fodder Scam: लालू प्रसाद यादव यांना पुन्हा तुरुंगवारी; राष्ट्रीय जनता दलाला धक्का, तेजस्वी यादव यांच्यासमोरील आव्हाने वाढली)
2022 मध्ये करण्यात आले होते किडनी प्रत्यारोपण -
यापूर्वी नोव्हेंबर 2022 मध्ये लालू प्रसाद यांचे किडनी प्रत्यारोपण करण्यात आले होते. लालू प्रसाद यांची मुलगी रोहिणी हिने वडिलांसाठी किडनी दान केली होती. सिंगापूरमधील रुग्णालयात हे प्रत्यारोपण करण्यात आले. प्रदीर्घ काळापासून या आजाराशी झुंज देत असलेले लालू प्रसाद यांनी तज्ज्ञ डॉक्टर आणि मुलगी रोहिणी यांच्या सल्ल्यानंतर किडनी प्रत्यारोपण करण्यास होकार दिला होता.