WhatsApp प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

सध्या सोशल मीडियात जगभर प्रसिद्ध असणारे व्हॉटसअॅप मध्ये बग आढळून आल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर व्हॉट्सअॅपकडून हा बग शोधून काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. परंतु आता एका भारतीय विद्यार्थ्याने व्हॉट्सअॅपमधील बग शोधून काढल्याने त्याला बक्षीस देण्यात आले आहे.

बग म्हणजे छोटीशी चुक किंवा कमतरता असे म्हटले जाते. तर केरळ येथील अभियांत्री शाखेत शिक्षण घेणाऱ्या अनंतकृष्ण या विद्यार्थ्याने या बगचा शोध काढला आहे. तर व्हॉट्सअॅप वापरणाऱ्या व्यक्तीच्या नकळत त्याला दुसऱ्या व्यक्तीची माहिती किंवा डेटा नष्ट करण्याचा संधी मिळते. त्यामुळे दुसरी व्यक्ती आपल्या नकळत आपल्या व्हॉट्सअॅपमधील माहिती डिलिट करु शकते असा बग अनंतकृष्ण या विद्यार्थ्याने शोधून काढला आहे.(मोबाईल नंबर सेव्ह न करता युजरला WhatsApp Group मध्ये अॅड करण्याची सोपी ट्रिक!)

मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, अनंतकृष्णा याने दोन वर्षांपूर्वीच या बग बद्दल फेसबुकच्या अधिकाऱ्यांना सांगितले होते. त्यानुसार त्यांनी या बगवर काम करण्यास सुरुवात केली असता अनंतकृष्णाने सांगितलेली माहिती योग्य असल्याचे समोर आले. त्यामुळे अनंतकृष्णाला 500 डॉलर्सचे बक्षीस देण्यात आले आहे. तसेच अनंतकृष्ण याचे नाव हॉल ऑफ फेम या मानाच्या यादीत त्याचे नाव नमूद केले आहे.