मोबाईल नंबर सेव्ह न करता युजरला WhatsApp Group मध्ये अॅड करण्याची सोपी ट्रिक!
WhatsApp (Photo Credits: Pixabay)

इंस्टन्ट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपचे (Whatsapp) जगात लाखो-करोडो युजर्स असून व्हॉट्सअॅप वेळोवळी युजर्ससाठी नवनवे फिचर्स सादर करत असतं. यातील ग्रुप चॅट हे फिचर चांगलेच लोकप्रिय ठरले. यामुळे एकावेळी अनेकांशी संवाद साधणे सोपे झाले. मात्र व्हॉट्सअॅपच्या अनेक फिचर्सबद्दल आपल्याला पुरेशी माहिती नाही. (WhatsApp वर लवकरच जाहिराती दाखवल्या जाणार)

व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये तुम्हाला कोणाला अॅड करायचे असेल तर त्या व्यक्तीचा नंबर आपल्याकडे सेव्ह असणे गरजेचे आहे. मात्र तुम्हाला ठाऊक आहे का? तुम्ही नंबर सेव्ह न करताही व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये त्या व्यक्तीला अॅड करु शकता. अलिकडेच व्हॉट्सअॅपने ग्रुप इनवाईट लिंक फिचर सुरु केले असून त्याच्या मदतीने अॅडमिन नंबर सेव्ह केल्याशिवाय युजरला ग्रुपमध्ये अॅड करु शकतो.

मोबाईल नंबर सेव्ह न करता व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड करण्यासाठी सोप्या स्टेप्स:

# सर्वप्रथम व्हॉट्सअॅप मेसेजिंग अॅप होम स्क्रिनवर ओपन करा.

# त्यानंतर ग्रुप विंडो ओपन करा.

# उजव्या बाजूला दिसणाऱ्या तीन डॉटवर क्लिक करा.

# यात दिसणाऱ्या पर्यायांपैकी 'ग्रुप इंफो' पर्यायावर क्लिक करा.

# खाली स्क्रोल करा आणि 'इनवाईट व्हाया लिंक' या पर्यायावर क्लिक करा.

# त्यानंतर सेंड लिंक व्हाया व्हॉट्सअॅप, कॉपी लिंक, शेअर लिंक, रिवोक लिंक यांसारखे पर्याय दिसतील. याच्या मदतीने तुम्ही नंबर सेव्ह न करता ग्रुपमध्ये अॅड करु शकता.

# ज्या युजरला तुम्हाला ग्रुपमध्ये अॅड करायचे आहे त्याला ही लिंक पाठवा.

या सोप्या 7 स्टेप्ससह तुम्ही नंबर सेव्ह न करता युजरला व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड करु शकता.