केरळ (Kerala) हे सर्व सार्वजनिक शाळांमध्ये उच्च तंत्रज्ञानाचे वर्ग असलेले देशातील पहिले राज्य ठरले आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन (Chief Minister Pinarayi Vijayan) यांनी राज्य सार्वजनिक शिक्षण क्षेत्र (State Public Education Sector) पूर्णपणे डिजिटल (Completely Digital) म्हणून घोषित केले आहे. कारण, केरळ हे सर्व सार्वजनिक शाळांमध्ये उच्च तंत्रज्ञानाचे वर्ग असलेले देशातील पहिले राज्य ठरले आहे. केरळमध्ये स्मार्ट क्लासरूम प्रकल्पासाठी 16,027 शाळांमध्ये 3.74 लाखाहून अधिक डिजिटल उपकरणे वाटली गेली.
हे केरळचं मोठ यश आहे, जे पुढच्या पिढीला लाभदायी ठरेल. एलडीएफ सरकारने या अभियानाचे नेतृत्व केले आहे. चार मोहिमांमुळे सार्वजनिक शिक्षणाला नवसंजीवनी मिळाली आहे. हे सर्व अभियान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अखत्यारीत होते. राज्यात उत्तम सार्वजनिक शिक्षण व्यवस्था असूनही ती वेळेवर विकसित होऊ शकली नाही, असं केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा - Coronavirus: कोरोना व्हायरसदरम्यान शाळा बंद राहिल्याने भारताला होऊ शकते 40 अब्ज डॉलर्सचे नुकसान; विद्यार्थ्यांचा फार मोठा तोटा- World Bank)
Kerala has become the first state in the country to have high-tech classrooms in all its public schools; visuals from Government Higher Secondary School for Girls Cotton Hill in Thiruvanathapuram. (12.11) pic.twitter.com/A6YTUIaZZv
— ANI (@ANI) October 12, 2020
गेल्या 5 वर्षात 5 लाख विद्यार्थी सरकारी शाळांमध्ये दाखल झाले. सार्वजनिक शिक्षण प्रणालीकडे लोकांचा दृष्टीकोन बदलला आहे. सरकारचे ध्येय शैक्षणिक आणि इतर क्षेत्रातील शाळांना आंतरराष्ट्रीय दर्जाप्रमाणे विकसित करण्याचे होते. राज्यातील कोणत्याही गावातल्या शाळेचे जगातील कोणत्याही भागातील सर्वोत्कृष्ट शाळासारखेचं मानक असले पाहिजे, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
कोरोना विषाणूचं महासंकट गेल्यानंतर शाळा पुन्हा सुरू केल्या जातील. सर्वांना दर्जेदार शिक्षण दिले पाहिजे. परंतु, शाळा आता पुन्हा उघडू शकत नाहीत. शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी परिस्थिती योग्य नाही. योग्य वेळी शाळा पुन्हा सुरू केल्या जातील, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.