जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांकडून सोपोर बसस्थानकाजवळ ग्रेनेड हल्ला; 9 जखमी, 6 जणांची प्रकृती चिंताजनक

जम्मू काश्मीरच्या (Jammu Kashmir) सोपोर (sopore) येथे दहशतवाद्यांनी (Terrorist) ग्रेनेड हल्ला (Grenade Attack) केला आहे. या हल्ल्यात 9 जण जखमी झाली असून त्यापैकी 6 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. दहशतवाद्यांनी सोपोरच्या गर्दी असलेल्या बस स्थानकाला लक्ष्य करुन लोकांवर ग्रेनेड हल्ले केला. हल्ल्यानंतर स्थानिक लोकांनी पोलिसांच्या मदतीने जखमींना ताबडतोब जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काश्मीरमध्ये मागील तीन दिवसातला हा दुसरा ग्रेनेड हल्ला आहे. यापूर्वी शनिवारी श्रीनगरमधील कर्णनगर भागात अतिरेक्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात सीआरपीएफचे 6 जवान जखमी झाले होते.

 

एएनआयचे ट्विट-