Ram Nath Kovind, Tirupati Laddus Row (फोटो सौजन्य -X/@TimesAlgebraIND)

Ram Nath Kovind On Tirupati Laddus Row: तिरुपती मंदिराच्या प्रसादाबाबतच्या (Tirupati Laddus Row) ताज्या वादाच्या पार्श्वभूमीवर माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ram Nath Kovind) यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी प्रसादातील भेसळ (Adulteration in Prasad) अत्यंत चिंताजनक असल्याचं म्हटलं आहे. शनिवारी एका कार्यक्रमादरम्यान रामनाथ कोविंद म्हणाले की, ही घटना उघडकीस आल्यानंतर हिंदूंमध्ये प्रसादाबद्दल असलेली श्रद्धा आता साशंक बनली आहे. बनारसमध्ये राहत असताना मला बाबा विश्वनाथांच्या दर्शनाला जाता आले नाही. पण माझे काही मित्र दर्शनासाठी गेले होते. तिथून आल्यावर त्यांनी मला बाबांचा प्रसाद दिला, तो प्रसाद माझ्या हातात येताच मला अचानक तिरुपती मंदिराच्या प्रसादाची आठवण झाली. पण सध्या भेसळीची जी बाब समोर आली आहे ती हिंदू धर्मग्रंथातील पापासारखी आहे.

तिरुपती मंदिरातील प्रसादात प्राण्यांच्या चरबीची भेसळ झाल्याची बाब समोर आल्यानंतर केंद्र सरकारने आंध्र प्रदेश सरकारकडून अहवाल मागवला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनीही या प्रकरणी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याशी चर्चा केली होती. या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असं आश्वासन चंद्राबाबू नायडू यांनी दिलं होतं. (हेही वाचा -Tirupati Laddus Row: तिरुपतीच्या प्रसादात प्राण्यांची चरबी? लाडू वादात, राजकारणही तापले)

तिरुपती मंदिर प्रसाद वादावर रामनाथ कोविंद यांची प्रतिक्रिया, पहा व्हिडिओ -

प्रसाद बनवण्यासाठी माशाच्या तेलाचाही वापर -

तिरुपती मंदिरात प्रसाद बनवताना बीफ फॅट आणि फिश ऑइलचा वापर होत असल्याचं नुकतंच एका अहवालात समोर आलं होतं. तिरुपती मंदिराच्या प्रसादाच्या चौकशीच्या अहवालात ही बाब समोर आली आहे, विशेष म्हणजे या प्रकरणी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी काही दिवसांपूर्वी आरोप केला होता की, मागील सरकारच्या काळात हा प्रसाद तयार करण्यात आला होता. तिरुपती मंदिरात तुपाऐवजी प्राण्यांची चरबी वापरली जात होती. हे आरोप लक्षात घेऊन मंदिरातील प्रसादाचा नमुना चाचणीसाठी पाठवण्यात आला होता. आता या तपासणीचा अहवाल आला आहे. या अहवालात प्राण्यांची चरबी वापरल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

सीएम नायडूंच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना जगन मोहन रेड्डी यांच्या पक्ष YSRCP ने म्हटले आहे की, चंद्राबाबू नायडू यांनी तिरुपती मंदिराच्या प्रसादाबाबत दिलेले विधान अत्यंत वाईट आहे. असे आरोप करण्यापूर्वी कोणीही नक्कीच विचार करेल. त्यांच्या या विधानाने नायडू राजकारणात काहीही करायला मागेपुढे पाहणार नाहीत हे सिद्ध झाले आहे. (हेही वाचा, Tirupati Laddu Controversy: तिरुपतीच्या श्री व्यंकटेश्वर मंदिरात लाडू बनवण्यासाठी वापरले गेले पाम तेल आणि प्राण्यांची चरबी; TDP चा गंभीर आरोप, शेअर केला NABL चाचणी अहवाल)

नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड (NDDB) च्या सेंटर फॉर लाइव्हस्टॉक अँड फूड ॲनालिसिस अँड स्टडीज (CALF) द्वारे केलेल्या विश्लेषणात इशारा देण्यात आला होता. या इशाऱ्यात असे म्हटले आहे की, हा अहवाल अनेक अटींवर अवलंबून असतो. अशा परिस्थितीत कधीकधी चाचणीचे निकालही चुकीचे येतात. तथापी, चंद्राबाबू नायडू यांनी केलेले आरोप आणि NDDB अहवालाने जगभरातील लाखो भाविकांना धक्का बसला आहे.