तिरुमाला तिरुपती देवस्थान प्रसाद (Tirumala Tirupati Devasthanam Prasadam) वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हा प्रसाद बनविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लाडवांमध्ये (Tirupati Laddus Row) तूप आणि इतर पदार्थांमध्ये प्राण्यांची चरबी माशाचे तेल (Beef Tallow, Fish Oil) असल्याचा धक्कादाक दावा करण्यात आला आहे. विद्यमान सत्ताधारी असलेल्या मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू (N Chandrababu Naidu) यांच्या तेलगू देसम पक्षाने (Telugu Desam Party) दावा केला आहे की, सदर प्रसादाच्या नमुन्यांमध्ये चरबीचे अंश प्रयोगशाळेत आढळून आले आहेत. या दाव्यांमुळे भक्त आणि नागरिकांमध्ये संताप आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
‘सनातन धर्म संरक्षण मंडळ’ स्थापन करावे: पवन कल्याण
आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी म्हटले आहे की, तिरुमाला तिरुपती बालाजी प्रसादममध्ये प्राण्यांच्या चरबीच्या (माशाचे तेल, डुकराचे मांस आणि गोमांस चरबी) वापर झाल्याचे ऐकून ते "खूप व्यथित" झाले आहेत. असा प्रकार म्हणजे सनातन धर्माच्या पावित्र्याचा अंत आहे. या गैरप्रकारांना जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे, असे सांगून कल्याण म्हणाले की, राष्ट्रीय स्तरावर ‘सनातन धर्म संरक्षण मंडळा’ची स्थापना करण्याची वेळ आली आहे. आपली मंदिरे सुरक्षीत ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्यांनी पुढे म्हटले की, वायएसआर काँग्रेस पार्टी (YSRCP) सरकारने स्थापन केलेल्या तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) बोर्डाने सदर प्रकाराबाबत उपस्थित प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. (हेही वाचा, Tirupati Laddu Controversy: तिरुपतीच्या श्री व्यंकटेश्वर मंदिरात लाडू बनवण्यासाठी वापरले गेले पाम तेल आणि प्राण्यांची चरबी; TDP चा गंभीर आरोप, शेअर केला NABL चाचणी अहवाल)
TTD बोर्डाने उत्तर द्यावे: उपमुख्यमंत्री
We are all deeply disturbed with the findings of animal fat (fish oil,pork fat and beef fat )mixed in Tirupathi Balaji Prasad. Many questions to be answered by the TTD board constituted by YCP Govt then. Our Govt is committed to take stringent action possible.
But,this throws… https://t.co/SA4DCPZDHy
— Pawan Kalyan (@PawanKalyan) September 20, 2024
TDP प्रवक्ते अमन व्यंकट रमन रेड्डी दाखवला कथीत लॅब रिपोर्ट
तिरुमाला तिरुपती देवस्थानकडून वितरीत करण्यात येणाऱ्या लाडू आणि प्रसादांचे नमुने गुजरात येथील एका पशुधन प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. या नमुन्यांमध्ये 'Lard' (स्वयंपाकात वापरण्यात येणारी डुकरांची चरबी) चा अंश आढळून आला आहे. या नमुन्यांच्या पाकिटांवर 9 जुलै 2024 ही तारीख आहे आणि त्यांचा अहवाल 16 जुलै रोजी आल्याचा दावा कथीतरित्या केला जातो आहे. तेलगू देसम पक्षाचे (TDP) प्रवक्ते अमन व्यंकट रमन रेड्डी यांनी कथीतर लॅब रिपोर्ट दाखवत दावा केला आहे की, प्रसादामध्ये वापरल्या जाणाऱ्या तूपात प्राण्यांची चरबी आहे. हेच चरबीपासून बनविलेले तूप लाडू बनविण्यासाठी वापरले जात असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. (हेही वाचा, TTD Trust: शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर तिरुपती देवस्थान ट्रस्टचे सदस्य; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जगनमोहन रेड्डी यांच्यात फोनवरुन चर्चा)
नरेंद्र मोदी, चंद्राबाबू नायडू यांनी राजीनामा द्यावा- काँग्रेस
तिरुपती प्रसादम वादावर काँग्रेस नेते रशीद अल्वी यांनी म्हटले आहे की, आज आंध्र प्रदेश सरकार आणि भाजप एकत्रच सत्तेत आहेत. भाजपला गोमांस किंवा धर्मात रस नाही. भाजप केवळ लोकांच्या भावनांशी खेळते. प्रसादात प्राण्यांची चरबी असेल आणि ते लाडू बनवण्यासाठी एवढ्या पवित्र ठिकाणी वापरलं जात असेल तर ते गंभीर आहे. मी म्हणेन की, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी राजीनामा द्यावा. घडलेला प्रकार सत्य असेल तर, तो करोडो लोकांचा आणि त्यांच्या श्रद्धांचा विश्वासघात आहे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही.
मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्याकडून आरोप
दरम्यान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी काल (18 सप्टेंबर) आरोप केले की, जगन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील YSRCP सरकारने तिरुपती लाडू बनवण्यासाठी निकृष्ट घटक आणि प्राण्यांची चरबी वापरली होती. हाच धागा पकडत सत्ताधारी टीडीपी YSRCP राजवटीवर मंदिराच्या पावित्र्याशी आणि धार्मिक भावनांशी तडजोड केल्याचा आरोप करत आहे.
वायएसआरसीपीने फेटाळले आरोप
YSRCP ने सर्व आरोप फेटाळले आहेत. आपल्यावर होणारे आरोप आणि केले जाणारे दावे 'निराधार' आहेत. भक्तांसाठी हा प्रसाद पारंपारिकपणे शुद्ध गाईच्या तूपाने बनवला जातो, असेही वायएसआरसीपीने म्हटले आहे.