LIC PAN Card Link for IPO: एलआईसी आईपीओसाठी तुमच्या पॉलिसी खात्याशी अपडेट करा पॅन कार्ड! अन्यथा करावा लागेल पश्चाताप
LIC | (File Photo)

LIC PAN Card Link for IPO: रशिया-युक्रेन युद्धाच्या वातावरणात सध्या किरकोळ गुंतवणूकदार LIC च्या IPO अपडेटची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यासाठी बाजार नियामक सेबीकडे कागदपत्रेही सादर करण्यात आली आहेत. तुम्ही देखील LIC IPO Pan Link ची वाट पाहत असाल, तर आता तुम्हाला फार काळ प्रतिक्षा करण्याची गरज नाही. तुम्हाला एलआयसी आयपीओमध्ये अतिरिक्त सवलत (Pan Link with LIC Policy) मिळवायची असल्यास, तुमचे डीमॅट खाते आणि पॅन ताबडतोब लिंक करा. आज 28 फेब्रुवारी ही त्याची शेवटची तारीख आहे.

जर तुम्ही देखील यामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हे जाणून घ्या की, ही तुमच्यासाठी चांगली संधी ठरू शकते. कारण या IPO मध्ये 10 टक्के हिस्सा LIC पॉलिसीधारकांसाठी राखीव असेल. म्हणजेच पॉलिसीधारकांना शेअर्स मिळण्याची शक्यता वाढेल. याशिवाय त्यांना सूटही मिळू शकते. (वाचा - रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना घेता येणार स्वादिष्ट भोजनाचा आनंद! देशातील 60 रेल्वे स्थानकांवर लवकरचं सुरू होणार RailRestro ची Food Service)

तुम्हालाही LIC IPO (LIC IPO - PAN Linking) मध्ये गुंतवणूक करायची असेल, तर त्यासाठी आधी काही कागदपत्रे तयार ठेवा. एलआयसी आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यासाठी, सर्वप्रथम तुम्ही एलआयसी पॉलिसी खात्याशी पॅन लिंक केलेले असणे आवश्यक आहे. पॅनला एलआयसी पॉलिसीशी कसे लिंक करावे. म्हणजेच ही दोन्ही कामे लवकरात लवकर निकाली काढणे तुमच्यासाठी आवश्यक आहे. त्याची अंतिम तारीख 28 फेब्रुवारी आहे.

एलआयसी पॉलिसीशी 'या' पद्धतीने लिंक करा पॅन कार्ड -

  • यासाठी, प्रथम LIC च्या अधिकृत वेबसाइटवर जा (link pan card with lic).
  • आता होमपेजवर 'Online PAN Registration' हा पर्याय निवडा.
  • आता नोंदणी पृष्ठावरील 'Proceed' वर क्लिक करा.
  • नवीन पृष्ठावर, पॅन, ईमेल, मोबाइल नंबर आणि पॉलिसी क्रमांक योग्यरित्या भरा.
  • यानंतर, कॅप्चा कोड योग्यरित्या प्रविष्ट करा.
  • आता OTP विनंतीवर क्लिक करा.
  • तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP येईल.
  • आता OTP टाका आणि सबमिट करा.
  • यानंतर तुम्हाला यशस्वी नोंदणीचा ​​संदेश मिळेल.
  • पुन्हा एकदा जन्मतारीख, पॉलिसी-पॅन क्रमांकानुसार स्थिती तपासा.

पॉलिसीधारक-कर्मचाऱ्यांचा हिस्सा राखीव

दीर्घ प्रतीक्षेनंतर आयपीओने स्पष्ट केले आहे की, हा हिस्सा एलआयसी पॉलिसीधारक आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी राखीव आहे. अहवालानुसार, सेबीला सादर केलेल्या मसुद्याच्या दस्तऐवजानुसार, पॉलिसीधारकांसाठी 10 टक्के हिस्सा राखून ठेवण्यात आला आहे. म्हणजेच तुमची एलआयसी पॉलिसी संपली असली तरीही तुम्ही राखीव कोट्यात बोली लावू शकता. याशिवाय ५ टक्के हिस्सा एलआयसी कर्मचाऱ्यांसाठी राखीव असेल.