Third Party Motor Vehicle Insurance: कार, बाईक खरेदी करता आहात? 1 जूनपासून विमा महाग होण्याची शक्यता; जाणून घ्या खिशावर किती पडेल बोजा?
Motor Vehicle Insurance | Representational Image (Photo Credits: Pixabay)

तुम्ही जर कार किंवा बाईक खरेदी करु इच्छित असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्त्वाची आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (Ministry of Road Transport and Highways) बुधवारी म्हटले की, विविध श्रेणींमध्ये वाहनाांसाठी थर्ट पार्टी वाहन विमा Third Party Motor Vehicle Insurance) हप्त्यांमध्ये वाढ केली. जी एक जूनपासून लागू होणार आहे. त्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या विमा हप्त्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. मंत्रालयाकडून अधिसूचित संशोधित दरानुसार एक हजार सीसी क्षमतेचे इंजिन असलेल्या खासगी कारसाठी वर्ष 2019-20 चा हप्ता 2072 रुपयांच्या तुलनेत आता 2094 रुपये भरावे लागू शकतात.

अशाच प्रकारच्या 1000 ते 15000 सीसी इंजिनच्या खासगी कारसाठी प्रीमियम 3221 रुपयांऐवजी आता तो 3416 रुपये होईल. दरम्यान, 1500 पेक्षा अधिक सीसीच्या खासगी कारसाठी थर्ट पार्टी वीमाच्या हप्त्यात कपात करण्यात आली आहे. आता हा 7,897 रुपयांवरुन घटून 7890 होईल. (हेही वाचा, Health insurance: हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय? आरोग्य विमा का आवश्यक असतो?)

दरम्यान, 150 ते 350 सीसीच्या दुचाकी वाहनांचा हप्ता 1366 रुपये राहील तर 350 पेक्षा अधिक सीसीच्या दुचाकी वाहनांसाठी हा दर 284 रुपये राहील.