Representational Image (Photo Credits: PTI)

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. 'स्टेट बँक ऑफ इंडिया'मध्ये (State Bank Of India) नोकरीची संधी उपलब्ध आहे. स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसरच्या पदांसाठी उमेदवारांचे अर्ज मागवण्यात आले आहेत. नियमित आणि कॉन्ट्रॅक्ट अशा दोन्ही स्वरुपासाठी नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. निवड प्रक्रियेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना 15 लाखापासून 52 लाखांपर्यंत पगार मिळेल. दहावी पास उमेदवारांना भारतीय रेल्वेत नोकरीची संधी ! पहा कसा आणि कुठे कराल अर्ज

9 जानेवारीपासून या पदांसाठी अर्ज स्वीकारले जात आहेत. नोकरीसाठी कोणतीही लेखी परिक्षा नसून फक्त मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड करण्यात येईल. या पदांसाठी तुम्ही 30 जानेवारीपर्यंत अर्ज करु शकता.

योग्यता

पदांनुसार योग्यता निश्चित करण्यात आली आहे.

अर्जाची फी

# सामान्य वर्ग- 600 रुपये

# आरक्षित वर्ग- 100 रुपये

निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारावरुन करण्यात येईल. जर दोन उमेदवारांना समान गुण मिळाल्यास वयाने मोठ्या उमेदवाराला संधी देण्यात येईल.

नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी

#सर्व प्रथम एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर www.sbi.co.in जा.

# तुमची माहिती भरुन रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करा.

# तुमची स्वाक्षरी आणि पासपोर्ट साईज फोटो स्कॅन करुन अपलोड करा.

# इतर विचारलेली माहिती भरुन फॉर्म पूर्ण भरा.

नोकरीसाठी अर्ज येथे करा

https://ibpsonline.ibps.in/sbisrcojan19/reg_start.php

तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी अजिबात दवडू नका.