लष्कराच्या All Out Operation ला यश, 2018 वर्षात तब्बल 311 दहशतवाद्यांचा खात्मा
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-PTI)

काश्मिर (Kashmir) खोऱ्यात गेल्या काही दशकांपासून दहशतवाद्यांनी उच्छाद मांडला होता. दशतवाद्यांच्या या उच्छादनाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी भारतीय लष्कराने ऑल आऊट ऑपरेशन (All Out Operation)चे आयोजन केले होते. त्यात आता पर्यंत एकूण 311 दहशतवाद्यांचा खात्मा केल्याने लष्कराला मोठे यश प्राप्त झाले आहे. याबद्दल लेफ्टनंट जनरल अनिल कुमार यांनी अधिक माहिती सोमवारी दिली आहे.

15 कॉर्प्स कमांडर लेफ्टनंच जनरल अनिल कुमार भट (Anil Kumar Bhatt) यांनी दिलेल्या माहितीनुसार, काश्मिर खोऱ्यातील 2018 च्या वर्षभरात 311 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. तसेच गेल्या वर्षातील दहशतवाद्यांना घालण्यात आलेल्या कंठस्नानाची संख्या ही यंदाच्या वर्षापेक्षा जास्त आहे.

भारतीय लष्करकडून वर्षभर व्यापक कारवाई करण्यात आली होती. तर लष्कराने ठरविलेल्या ऑल आऊट ऑपरेशनमध्ये लष्कर ए तोयबा, हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या कमांडर यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. तसेच शोध मोहिम राबवून इतर ठिकाणी लपलेल्या दहशतवाद्यांना शोधून काढून त्यांचा ही खात्मा करण्याता आला आहे.