जम्मू काश्मीर- भारतीय जवानांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान
फोटो सौजन्य- ANI

जम्मू काश्मीर येथील बडगामधील झागू अरिजल या ठिकाणी भारतीय जवानांनी दोन दहशवाद्यांना कंठस्नान घालण्यास यश आले आहे. तर या दोन गटातील चकमकीला गुरुवारी पहाटे पासून सुरुवात झाली होती.

भारतीय लष्कराला झागू अरिजस येथे दहतवादी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती. या मिळालेल्या माहितीनुसार जवानांनी दहशतवादी असेलेल्या ठिकाणाला घेराव घातला.

या दोघांमध्ये चालू झालेल्या गोळीबाराला जवानांनी सडेतोड उत्तर देत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. तसेच उर्वरित दहशतवाद्यांचा शोध भारतीय जवान घेत आहेत.