SBI (Photo Credits: Facebook)

SBI Clerk Recruitment 2021 Notification:  कोरोना संकटामुळे देशात पुन्हा कोविड 19 चं संकट गडद होतानाचं चित्र आहे. पण या काठीण काळातही काही सकारात्मक गोष्टी समोर येत आहे. सार्वजनिक क्षेत्रातील सगळ्यात मोठी बॅंक म्हनजे भारतीय स्टेट बॅंक, अर्थात एसबीआय(SBI). सध्या एसबीआय ने देशभर त्यांच्या शाखेमध्ये क्लेरिकल कॅडर मध्ये ज्युनियर असोशिएट (Junior Associates) पदासाठी 5000 पेक्षा जास्त जागांची भरती केली जाईल अशी घोषणा केली आहे. कालच त्याचं नोटिफिकेशन देखील प्रसिद्ध करण्यात आले आहे. दरम्यान तुम्ही देखील या नोकरभरतीसाठी इच्छूक असाल तर जाणून घ्या कसा कधी कुठे कराल अर्ज?

एबसीआय मधील या नोकरभरतीसाठी इच्छुक उमेदवारांना अधिकृत वेबसाईट sbi.co.in वर ऑनलाईन अर्ज दाखल करायचा आहे. यामध्ये एसबीआय क्लार्क भरती 2021 ऑनलाईन अ‍ॅप्लिकेशन करण्यासाठी आज (27 एप्रिल) पासून सुरूवात होणार आहे. उमेदवार 17 मे पर्यंत हा अर्ज करू शकतील. या ऑनलाईन अर्जासाठी 750 रूपये अ‍ॅप्लिकेशन फी आहे. तुम्ही ही ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण केली असेल तर 1 जून पर्यंत फॉर्मचा प्रिंट आऊट घेऊन सोफ्ट कॉपी देखील डाऊनलोड करू शकता. (नक्की वाचा: Indian Navy AA/SSR 2021: नौसैनिक मध्ये 2500 पदांवर नोकर भरती, उमेदवारांना आजपासून अर्ज करता येणार).

महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्यास सुरूवात: 27 एप्रिल 2021

अर्ज करण्याची अंतिम मुदत: 17 मे 2021

प्री एक्झाम ट्रेनिंग कॉल लेटर: 26 मे 2021

प्री लिम्स परीक्षा: जून 2021

मुख्य परीक्षा: 31 जुलै 2021

 इथे पहा सविस्तर नोटिफिकेशन

कशी असेल निवडप्रक्रिया

एसबीआय मध्ये क्लेरिकल कॅडर मधील ज्यूनियर असोशिएट्स पदासाठी इच्छूक उमेदवारांना आधी ऑनलाईन प्रारंभिक परीक्षा, ऑनलाईन मुख्य परीक्षा आणि स्थानिक भाषेची एक परीक्षा देणं गरजेचं आहे. यामध्ये प्रारंभिक परिक्षेत 1 तासात इंग्रजी भाषा, संख्यात्मक योग्यता आणि तार्किक क्षमता यांना मिळून 100 प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. यामध्ये निगेटीव्ह मार्किंग सिस्टिम आहे. परीक्षेचा हा टप्पा पार करणारे पुढे मुख्य परीक्षा देऊ शकतील.