Indian Navy AA/SSR 2021: नौसैनिक मध्ये 2500 पदांवर नोकर भरती, उमेदवारांना आजपासून अर्ज करता येणार
JOB प्रतिकात्मक फोटो (File Photo)

Indian Navy AA/SSR 2021: इंडियन नेव्ही मध्ये सेलर्स इंट्री अंतर्गत आर्टिफिशर अप्रेंसिटस आणि सीनियर सेकेंड्री रिक्रुट्स बॅचसाठी अर्ज प्रक्रिया आजपासून सुरु झाली आहे. इंडियन नेवी एए/एसएसआ 2021 भरतीसाठी येत्या 30 एप्रिल पर्यंत अर्ज करता येणार आहे. भारतीय नौसेनेच्या नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी एए150 आणि एसएसआर-02/2021 च्या ऑनलाईन अर्जासाठी joinindiannavy.gov.in येथे भेट द्यावी. भारतीय नौसेने द्वारे सेलर इंट्री एए-150 आणि एसएरआर-02/2021 बॅच अंतर्गत 2500 पदांसाठी अपडेट गेल्या आठवड्यातच जाहीर केले आहे.

इंडियन नेव्ही सेलर्स नेवी सेलर्स सीनियर सेंकेंड्री रिक्रुटर्ससाठी अर्ज करणाऱ्यांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डामधून गणित आणि फिजिक्स विषयासह केमिस्ट्रि किंवा बायोलॉजी किंवा कंप्युटर सायन्स विषयासह 10+2 परीक्षा उत्तीर्ण असावे. अद्याप आर्टिफिशर अप्रेंटिस इंट्री 2021 साठी उमेदवारांना या परीक्षेत कमीतकमी 60 टक्के अंक मिळणे आवश्यक आहे. तसेच दोन्ही पदांसाठी उमेदवाराचे वय 17 वर्षांपेक्षा कमी किंवा 20 वर्षाहून अधिक नसावे. तर इंडियन नेव्ही एए/एसएसआर भरती 2021 अधिसूचनेनुसार कोविड19 च्या परिस्थितीमुळे जवळजवळ 10 हजार उमेदवारांना लेखी परीक्षा आणि शारीरिक दक्षता परीक्षासाठी बोलावले जाणार आहे.(Eastern Coal Limited Recruitment 2021: ईस्टर्न कोल लिमिटेड मध्ये 75 पदांसाठी नोकर भरती, येत्या 30 एप्रिल पर्यंत करता येणार अर्ज)

या व्यतिरिक्त नुकत्याच पश्चिम रेल्वेने सुद्धा त्यांच्या विविध पदांवर नोकर भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर केले आहे. त्यानुसार इलेक्ट्रिशन, फिटर, वेल्डर, पेंटर, कारपेंटर, प्लम्बर, ब्लॅकस्मिथ, वायरमॅनसह अन्य पदांवर नियुक्ती करण्यात येणार आहे. यामध्ये एकूण 716 जणांची निवड केली जाणार आहे. त्यामुळे इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट @wcr.indianrailways.gov.in येथे अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल आहे.