Eastern Coal Limited Recruitment 2021: ईस्टर्न कोल लिमिटेड मध्ये विविध पदांवर नोकर भरती संदर्भात एक नोटीस जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार सीनियर मेडिकल स्पेशलिस्ट, मेडिकल स्पेशलिस्ट E3, सीनियर मेडिकल ऑफिसर डेंटलच्या पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. एकूण 38 पदांवर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. त्यामुळे इच्छुक असलेल्या उमेदवारांनी www.easterncoal.gov.in वर अर्ज करता येणार आहे. ईस्टर्न कोल लिमिटेडकडून जाहीर करण्यात आलेल्या नोटिफिकेशनुसार सीनियर मेडिकल स्पेशलिस्ट ई4, मेडिकल स्पेशलिस्टच्या 22 पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. तर सीनियर मेडिकल ऑफिसरत्या 51 आणि सीनियर मेडिकल ऑफिसर डेंटल ई3 च्या 2 पदांवर नियुक्ती केली जाणार आहे.
ECL नुसार, सीनियर मेडिकल ऑफिसरच्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून एमबीबीएसची डिग्री घेतलेली असावी. तसेच उमेदवारांना 3 वर्षाचा अनुभव असावा. या व्यतिरिक्त सीनियर मेडिकल ऑफिसर डेंटल ई3 च्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदावरांनी कोणतयाही मान्यताप्राप्त संस्थेतून बीडीएस डिग्री घेतलेली असावी. तसेच एका वर्षाचा अनुभव असावा. उमेदवारांनी लक्षात ठेवावे की नोटिफिकेशन नीट वाचावे. कारण अर्ज करताना एखादी सुद्धा चुकी झाल्यास तुमचा अर्ज स्विकारला जाणार नाही.
सीनियर मेडिकल ऑफिसर पदासाठी 70 हजार ते 2 लाखांपर्यंत असू शकते. तसेच सीनियर मेडिकल ऑफिसर, सीनियर मेडिकल ऑफिसर डेंटल 60 हजार ते 1 लाख 80 हजारापर्यंत असू शकते.(Army Recruitment 2021: भारतीय सेनेच्या डेंटल कोरमध्ये नोकर भरती, येत्या 18 मे पर्यंत उमेदवारांना करता येणार अर्ज)
या व्यतिरिक्त नुकत्याच पश्चिम रेल्वेने सुद्धा त्यांच्या विविध पदांवर नोकर भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर केले आहे. त्यानुसार इलेक्ट्रिशन, फिटर, वेल्डर, पेंटर, कारपेंटर, प्लम्बर, ब्लॅकस्मिथ, वायरमॅनसह अन्य पदांवर नियुक्ती करण्यात येणार आहे. यामध्ये एकूण 716 जणांची निवड केली जाणार आहे. त्यामुळे इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट @wcr.indianrailways.gov.in येथे अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल आहे.