Representational Image (Photo Credits: File Photo)

Army Dental Corps Recruitment 2021: भारतीय डेंटल कोर मध्ये सरकारी नोकरी करण्यास इच्छुक असलेल्यांसाठी मोठी बातमी आहे. कारण भारतीय सेनेत डेंटल कोर मध्ये शार्ट सर्विस कमीशन 2021 प्राप्त ऑफिसर पदासाठी नोकर भरती सुरु करण्यात आली आहे. आर्मी डेंटलमध्ये एकूण 37 रिक्त पदांवर योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी भारतीय सेनेची वेबसाइट joinindianarmy.nic.in येथे असलेल्या ऑनलाईन फॉर्मच्या माध्यमातून नोकरीसाठी अर्ज करु शकता. अर्ज प्रक्रिया 19 एप्रिल पासून सुरु झाली आहे. तर उमेदवारांना अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख 18 मे 2021 दिली गेली आहे.(ISRO Recruitment 2021: इस्रो मध्ये अकाउंट्स आणि अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर पदासाठी नोकर भरती, 'या' तारखेपर्यंत करता येणार अर्ज)

भारतीय सेने द्वारे डेंटल कोर एसएससी 2021 ऑफिसर भरतीसाठी जाहीर करण्यात आलेल्या नोटीसनुसार उमेदवारांना डेंटल काउंसिल ऑफ इंडिया द्वारे मान्यताप्राप्त कॉलेज/युनिव्हर्सिटी मधून बीडीएस/एमडीएस डिग्री घेतलेली असावी. त्याचसोबत उमेदवरांनी डीसीआय द्वारे एक वर्ष अनिवार्य रोटेरी इंटर्नशिप 31 मार्च 2021 पर्यंत अनिवार्य रुपात केलेली असावी. त्याचसोबत उमेदवारांकडे 31 डिसेंबर 2021 पर्यंत वैध राज्यदंत चिकित्सा परिषद/डीसीआयचे दंत विभागातील प्रमाणपत्र सुद्धा असावे. त्याचसोबत अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय 31 डिसेंबर 2021 ला 45 वर्षाहून अधिक नसावे.(Job Recruitment: IT क्षेत्रातील लोकांसाठी मोठी बातमी; Infosys, HCL Tech, TCS आणि Wipro देणार 1 लाख फ्रेशर्सना नोकऱ्या)

दरम्यान, उमेदवारांनी लक्षात ठेवावे की फक्त जे विद्यार्थी (बीडीएस/एमडीएस) ज्या राष्ट्रीय सह प्रवेश परीक्षा NEET (MDS)-2021, NBE, नवी दिल्लीच्या विविध परीक्षा केंद्रावर 16 डिसेंबर 2020 मध्ये सहभागी झाले होते त्यांनाच अर्ज करता येणार आहे. त्याचसोबत उमेदवारांना अर्जासह एमडीएस 2021 चे अॅडमिट कार्डची कॉपी सुद्धा जोडावी लागणार आहे.