ISRO (Image: PTI)

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनाइजेशन (Indian Space Research Organization, ISRO) मध्ये विविध पदासाठी नोकर भरती करण्यात येणार आहे. त्यानुसार अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, अकाउंट ऑफिसर आणि पर्चेस अ‍ॅन्ड स्टोर ऑफिसरसह अन्य पदांवर योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. यामध्ये एकूण 24 पदांसाठी नियुक्ती केली जाणार आहे. या पदांसाठी अर्ज करणाऱ्यांनी लक्षात ठेवावे की, इच्छुक उमेदवारांनी येत्या 21 एप्रिल 2021 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.(Pune Metro Rail Recruitment: पुणे मेट्रो रेल प्रोजेक्ट मध्ये नोकरीची संधी; 15 मे पूर्वी असा करा अर्ज)

इस्रोकडून जाहीर करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार एकूण 24 पदांवर योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. तर अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत बेवसाइट www.isro,gov.in वर जाऊन अर्ज करावा. नोटिफिकेशन नुसार पर्चेस अॅन्ड स्टोर ऑफिसरच्या 12, अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर 06 आणि अकाउंट्स ऑफिसर 06 पदांसाठी नोकर भरती केली जाणार आहे.(Bank of Baroda Recruitment 2021: बँक ऑफ बड़ौदा मध्ये नोकरीची संधी, उमेदवारांना 29 एप्रिल पर्यंत करता येणार अर्ज)

>>महत्वाच्या तारखा-

ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख- 1 एप्रिल 2021

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख- 21 एप्रिल 2021

शुल्क भरण्याची अंतिम तारीख- 23 एप्रिल 2021

इस्रोकडून जाहीर करण्यात आलेल्या नोटिफिकेशन नुसार, अकाउंट्ससह अन्य पदांवर नोकर भरतीसाठी शैक्षणिक योग्यता वेगवेगळी आहे. त्यानुसार अकाउंट्स ऑफिसर पदासाठी उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून एसीए/एफसीए किंवा आयसीडब्लूएक/एफआयसीडब्लूए किंवा एमबीए किंवा एमकॉम मध्ये 1 वर्षांचा अनुभव असावा. या व्यतिरिक्त B.com/BBA/BBM केलेले असावे. तर अॅडमिनिस्ट्रेटिव्ह पदासाठी उमेदवाराने एमबीएसह सुपरवाइजर पदाचा 1 वर्ष अनुभव किंवा पोस्ट ग्रॅज्युएटसह 3 वर्षांचा अनुभव किंवा 5 वर्षांचा अनुभव असावा. तसेच अन्य नियुक्तीसंदर्भातील माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.